चाळीसगाव महाविद्यालयात वक्तृत्व, वादविवाद, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे भागीरथीबाई पूर्णपात्रे कला, सीताबाई मांगीलाल अग्रवाल विज्ञान आणि कस्तुरबाई खंडू चौधरी वाणिज्य महाविद्यालय आणि केशव रामभाऊ कोतकर कनिष्ठ महाविद्यालय चाळीसगाव आयोजित श्रीमती सीताबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमती शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्ट चाळीसगाव यांच्या सहकार्याने झालेल्या ३८ व्या कै. गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृती करंडक वक्तृत्व, श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृती करंडक वादविवाद आणि नारायण अग्रवाल गौरवार्थ करंडक उत्स्फूर्त वक्तृत्व राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचे पारितोषिक वितरण प्राचार्य डॉ. एन. एन.गायकवाड (रजनीताई पाटील महाविद्यालय, भडगाव), संदीप पाटील (पोलीस निरीक्षक, चाळीसगाव) यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर. सी. पाटील होते. स्पर्धेत माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगाव महाविद्यालय आणि राष्ट्रीय महाविद्यालय, चाळीसगावने फिरते चषक जिंकले.

यावेळी दोन्हीही पाहुण्यांनी मनोगतांमधून अनुभव सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करुन सर्व विजेत्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना आर. सी. पाटील यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना स्पर्धेसाठी खूप तयारी करा. स्पर्धेसाठी स्पर्धा करा, प्रत्यक्ष जीवनात चांगले नागरिक बना असे सांगितले. श्रीमती सीताबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीमती शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्‍वस्त तथा उद्योजक सुशिल अग्रवाल यांनी प्रयोजक नात्याने मनोगत व्यक्त करुन स्पर्धेच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. गणेश मोहिते यांनी परीक्षकाचे मनोगत मांडले. स्पर्धेचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक डॉ. वीरा राठोड यांनी केले.

कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर (सहसचिव, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी), सुरेश स्वार (चेअरमन, सीनियर कॉलेज कमिटी), सुशील अग्रवाल (प्रायोजक शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट), ज्येष्ठ संचालक ॲड. प्रदीप अहिरराव उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण सुनील पाटील (कबचौ उमवि, जळगाव), डॉ. गणेश मोहिते (देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), डॉ. रमेश औताडे (सोयगाव महाविद्यालय), डॉ. पंकज नन्नावरे यांनी केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी पाहुण्यांसह स्पर्धकांना संस्था आणि महाविद्यालयाची माहिती करून दिली. सूत्रसंचलन डॉ. मनिषा सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील तर आभार महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कला खापर्डे यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य प्रा. ए. आर. मगर, कार्यालयीन अधीक्षक हिम्मत आंदोरे यांच्यासह नागरिक, पत्रकार, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल असा :

पूर्णपात्रे स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेत सांघिक चषक- मंथन कुमावत आणि मयुरी सोमवंशी (बीपी आर्ट्स, एसएमए सायन्स अँड केकेसी कॉमर्स कॉलेज,चाळीसगाव), प्रथम श्रुती अशोक बोरस्ते (एचपीटी कॉलेज, नाशिक), द्वितीय धर्मेश हिरे (विद्यावर्धिनी कॉलेज, चाळीसगाव), तृतीय यश पाटील (बीके बिर्ला कॉलेज, मुंबई), सीताबाई अग्रवाल स्मृती करंडक वादविवाद स्पर्धेत सांघिक चषक -ऐश्‍वर्या तनपुरे आणि सौरभ औटे, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर, प्रथम यश पाटील (बीके बिर्ला कॉलेज, मुंबई), द्वितीय ऐश्‍वर्या तनपुरे, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर, तृतीय धर्मेश हिरे तर नारायण अग्रवाल गौरवार्थ उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत सांघिक चषक – रामेश्‍वर राठोड आणि पूजा माळी, राष्ट्रीय कॉलेज चाळीसगाव, प्रथम यश पाटील, धर्मेश हिरे विभागून द्वितीय मंथन कुमावत, बीपी आर्ट्स, एसएमए सायन्स अँड केकेसी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव, तृतीय रामेश्‍वर राठोड, राष्ट्रीय महाविद्यालय, चाळीसगाव यांनी पटकावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here