साईमत : जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शनी पेठेतील शनी मंदिरात शिवशंकर मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त महादेवाची विविध शृंगार साकारत आहे. पहिल्या श्रावण सोमवारी फुलांचा महादेव, दुसऱ्या सोमवारी दिव्यांचा महादेव, तिसऱ्या सोमवारी रांगोळी पासून शिवलिंग थ्रीडी बनविण्यात आले आणि चौथ्या सोमवारी सप्त धान्य पासून महाकलेश्वर चे शिवलिंग बनविले आहे.
त्यात धान्याची सामग्री अशी, 51 किलो गहू, तांदूळ, हरिवे मूग, उडीद, चणा डाळ, ज्वारी, मसूर डाळ या धान्यापासून शिवलिंगाची आरास साकारण्यास 2 तासाचा अवधी लागला. ही शिवलिंगाची आरास मानव सेवा शाळेतील कला शिक्षक सुनील दाभाडे सर यांनी आपली कला साकारली आणि सर्व शिवभक्त यांनी मदत दिली.सुनिल दाभाडे यांचे अभिनंदन केले.