साईमत जळगाव प्रतिनीधी
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे निमित्ताने दिनांक २० सप्टेंबर बुधवार रोजी शिवाजी नगर परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक १ येथे नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा भाग म्हणून रात्र शाळा भेट करण्यात आली.
रात्र शाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आय.ए.एस प्रशिक्षणार्थी श्री. अर्पित यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहायुक्त अभिजीत बाविस्कर, मनपा प्रशासनाधिकारी दिपाली पाटील, मुकेश सर व त्यांचे सदस्य टीम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ.विद्या गायकवाड प्रशासक तथा आयुक्त जळगाव मनपा यांचे अधिपत्याखाली करण्यात आले.
१५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना शिक्षण देणे ज्यांच्याकडे वाचन आणि लेखन कौशल्ये नाहीत, तसेच जे विविध कारणांमुळे १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. यातील अभ्यासक्रम मूलभूत संख्या आणि अक्षरे शिकवणे. आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, व्यावसायिक कौशल्ये, आरोग्यसेवा आणि जागरुकता, बाल संगोपन आणि शिक्षण आणि कुटुंब कल्याण मध्ये शिक्षण देणे. स्थानिक रोजगार सुरक्षित करण्यासाठी आणि मूलभूत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये सुसज्ज करणे. प्रशिक्षक म्हणून समर्पित स्वयंसेवक शिक्षक राहणार आहे.