Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»अध्यापनाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शालेय पोषण आहार ऑडिट निर्णयास शिक्षक शिक्षकेतर महासंघाचा विरोध
    राजकीय

    अध्यापनाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शालेय पोषण आहार ऑडिट निर्णयास शिक्षक शिक्षकेतर महासंघाचा विरोध

    SaimatBy SaimatAugust 3, 2022Updated:August 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    शाळांमधील शालेय पोषण आहाराचे गेल्या पाच वर्षाचे ऑडिट करण्याचे निर्दश शासनाने दिले आहे मात्र या कामास खाजगी व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ शाखा यावल यांच्यातर्फे सुद्धा विरोध नोंदविण्यात आला.
    महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ यावल शाखा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळांमधील शालेय पोषण आहाराचे गेल्या पाच वर्षाच्या ऑडिट करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे  मात्र या कामास खाजगी व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. या कामामुळे अध्यापनाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाने केली आहे.
    कोरोना नंतर शाळा नियमित सुरू झाल्या त्यासोबतच निपुण चाचणी, शाळाबाह्य सर्वेक्षण, सेतू अभ्यास अशी अनेक शैक्षणिक कार्य सुरू आहे.या कामाकडेच अधिक लक्ष द्यावे लागत असल्यामुळे ऑडिटचे काम थांबवून या निर्णयाला स्थगिती द्यावी या मागणीचे निवेदन यावल गटशिक्षण अधिकारी शेख नईम यांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष आशिष बोरोले, उपाध्यक्ष पुरुषोत्तम साठे, सचिव हेमचंद खाचणे, तालुका सदस्य धनंजय काकडे, शकील तडवी, जिल्हा कार्यकारणी सदस्य सलीम तडवी सर उपस्थित होते. शिक्षकांनी कामाचा ताण हलका केल्यास त्यांना अध्यापनावर अधिक लक्ष देता येईल त्यामुळे मागणीची दखल घ्यावी अशी अपेक्षा महासंघाच्या वतीने आशिष बोरोले यांनी व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.