जामनेर पालिकेत अतिक्रमणधारकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

0
3

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर :

शहरातील फळ विक्रेते व हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या समस्येसंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने गेल्या ५ रोजी निवेदन दिले होते. निवेदनावर तीन दिवसात कुठलीही कार्यवाही न झाल्याने अखेर हातगाडी धारकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून हातगाडी धारकांच्या समस्येवर तात्पुरता मार्ग काढला आहे. रहदारीला अडथळा होणार नाही त्याची खबदारी घेऊन हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना हातगाडी लावण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे.

आंदोलनानंतर मुख्याधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी युवक तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सचिन बोरसे, प्रल्हाद बोरसे, उत्तम पाटील, संतोष झाल्टे, मोहन चौधरी, विनोद माळी, सौरभ अवचारे, अयफाज, खालीद, रामदास पालवे आदींच्या शिष्टमंडळाने चर्चा करून हातगाडी धारकांच्या समस्येवर तात्पुरता मार्ग काढला आहे. रहदारीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेवून हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना हातगाडी लावण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे.शहरात गेल्या २३ दिवसांपासून व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर बसण्यास बंदी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. चर्चेअंती तात्पुरता का होईना त्यांना दिलासा मिळाला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

पालिकेला महसूल मिळूनही सुविधांचा अभाव

शहरात नगरपालिकेचे सुसज्ज भाजीपाला मार्केट व फळ मार्केट नसल्याने शहरातील हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिक ४०० ते ५०० फळ विक्रेते आणि हातगाडी व्यवसायिक आहे. त्यांच्या माध्यमातून नगरपालिकेला ३० ते ३५ लाखांचा महसूल जमा होतो. त्या बदल्यात कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here