साईमत, जळगाव, प्रतिनिधी
शहरातील नेरी नाका परिसरातील पांझरापोळ संस्थानच्या मैदानात पवित्र श्रावण महिन्यानिमित्त भव्य पाच दिवसीय संगीतमय शिव महापुराण कथेचे दुपारी 1.30 ते सायंकाळी 5:30 यादरम्यान आयोजन करण्यात आले असून आज दि. 31 ऑगस्टपासून कथेला सुरुवात होत आहे.
कथेचे मुख्य संयोजक आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा यांच्यासह शिवमहापुराण समिती व दादाजी फाऊंडेशनतर्फे हा पवित्र संगीतमय शिव महापुराण कथा महोत्सव 4 सप्टेंबर 2023 पर्यंत साजरा होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रशासक विशाल सुरेश भोळे यांनी दिली.
यानिमित्ताने बुधवारी सायंकाळी उत्तर प्रदेशातील श्रीधाम वृंदावन येथील आंतरराष्ट्रीय शिव कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी शास्त्रीजी यांचे शहरात आगमन झाले असता संपूर्ण भक्तीभावाने व जल्लोशात आयोजकांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी शहराचे आमदार सुरेश दामू भोळे ऊर्फ राजूमामा, माजी महापौर सौ.सीमाताई भोळे, अशोक जाजू व रमेश जाजू यांच्यासह श्री.व सौ.रुपाली भावसार, हेमंत देशमुख, दिनेश तिवारी, विकास शिंपी, रामदयाल सोनी, किशोर भंडारी, अजय डेडिया तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.