Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा
    फैजपूर

    Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा

    saimatBy saimatMarch 15, 2026Updated:March 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Muktai Palkhi ceremony in Faizpur city
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     ऐतिहासिक आगमन, भाविक उत्साहात रंगले शहर

    साईमत/फैजपूर / प्रतिनिधी

    फैजपूर शहरात यावर्षी आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता पालखी सुभाष चौकात आगमन होणार आहे, अशी माहिती डिंगंबर महाराज चिनवलकर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली.

    यावर्षीच्या मुक्ताई फिरता नारळी सप्ताहाचे यजमानपद सेवा यावल व रावेर तालुक्यांना मिळाले असून, महोत्सवाचे नियोजन महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज व रवींद्र हरणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

    पालखी सोहळा सुभाष चौकातून खुशालभाऊ रोड मार्गे श्रीराम मंदिराकडे मार्गस्थ होणार असून, पुढे विठ्ठल मंदिरात थांबणार आहे. आयोजकांनी भाविकांना आवाहन केले आहे की, विठ्ठल मंदीर परिसरात येऊन पालखीचे दर्शन घ्यावे.

    सोहळ्यासाठी शहरातील नागरिकांनी विविध तयारी केली आहे. दिंडी मार्गावर स्वच्छता, रांगोळी, पुष्पवृष्टी तसेच गुढी उभारणी करण्यात आली आहे. यामुळे पालखीच्या स्वागताचे वातावरण आणखी भव्य आणि भक्तिभावपूर्ण बनले आहे.

    या ऐतिहासिक सोहळ्यात शहरातील सतपंथ मंदिर, महानुभाव मंदिर, स्वामीनारायण मंदिर, खंडोबा मंदिर, गणपती वाडी मंदिर, विविध देवी मंदिर, तसेच गणेश मंडळे, दुर्गोत्सव मंडळे, खुशाल महाराज रथोत्सव मंडळ, इस्कॉन मंदिर, प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था, दादाजी धुनिवाले, संत गजानन महाराज भक्त परिवार, साई भक्त परिवार, स्वामी समर्थ सेवा भक्त परिवार आणि महिला भजनी मंडळ यासारख्या संघटनांमधील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

    महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज, श्रीमद् भागवत कथा समिती फैजपूर तसेच ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, या ऐतिहासिक मुक्ताई पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

    फैजपूरच्या गल्ली-बाजारातून विहार करताना पालखी सोहळा भक्ती, उत्साह आणि ऐक्याचा संदेश घेऊन शहरभर पसरणार आहे. प्रथमच फैजपूर येथे येत असल्यामुळे, भाविकांमध्ये अपार आनंद आणि उत्साहाची लाट पाहायला मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026

    Faizpur : राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

    December 27, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.