खासदार इम्तियाज जलील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२१-२०२२,तिडका येथे ४६ शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव

0
2

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील आदर्श शिक्षक सोहळा दिनांक १५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील तिडका येथे संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक एमआयएम सोयगाव तालुका अध्यक्ष रईस शेख( अखिर दादा यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशावरून केले होते हा पुरस्कार सोहळा केंद्रीय प्राथमिक शाळा तिडका येथे पार पडला यावेळी तालुक्यातील ४६ शिक्षकांना ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त प्रमुख अतिथी सोयगावचे तहसीलदार रमेश जसवंत, खासदार इम्तियाज जलील यांचे सुपुत्र बिलाल जलील, एमआयएम जिल्हा अध्यक्ष समीर साजेद बिल्डर,सोयगाव तालुका शिक्षणविस्तार अधिकारी आढाव यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव व सत्कार करण्यात आला यावेळी नंदू बापू सोळंके, मुकेश शेठ, तिडका गावचे सरपंच यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते तसेच तिडका गावातील ग्रामस्थ ,शिक्षणप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here