जळगाव प्रतिनिधी | शिरसोली गावातील बंद घरात झालेल्या मोठ्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन अट्टल चोरांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून ६,६८,७९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शिरसोली येथे झाली होती घरफोडी:
फिर्यादी राजेंद्र दौलत आंबटकर (रा. शिरसोली प्र.बो., ता. जि. जळगाव) हे ३० एप्रिल २०२६ ते ५ मे २०२६ दरम्यान बाहेरगावी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवली होती. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली आरोपींना अटक:
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पुढील तीन आरोपींना ताब्यात घेतले:
१) मुन्ना शहा सुलतान शहा (वय २२): याला बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथून अटक करण्यात आली.
२) मुस्तकीन उर्फ जुनेद भिकन शहा (वय २३, रा. तांबापुरा, जळगाव): हा या टोळीचा मुख्य सराईत गुन्हेगार असून, याला सैलानी धाड (जिल्हा बुलढाणा) येथून ताब्यात घेतले. त्याच्यावर आधीच रामानंद, पारोळा, भुसावळ आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
३) जाबीर शहा जावेद शहा (वय २०): याला भुसावळ येथून अटक करण्यात आली.

जप्त केलेला मुद्देमाल (एकूण ६,६८,७९० रुपये):
-
- १०,००० रुपये रोख (५०० रुपयांच्या २० नोटा)
- ३,६०,७९० रुपये किमतीची सोन्याची फॅन्सी शॉर्टपोत (२६.७८० ग्रॅम)
- ३८,००० रुपये किमतीच्या सोन्याच्या फॅन्सी रिंग (२.७८० ग्रॅम)
- ७०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र (६ ग्रॅम)
- १,४_०,००० रुपये किमतीची सोन्याची चैन (१० ग्रॅम)
- ५_०,००० रुपये किमतीची हिरो होंडा सी.बी.झेड. मोटरसायकल
यांनी केली कारवाई:
ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पीएसआय राजेंद्र उगले, प्रदीप चौधरी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे या पोलीस अंमलदारांचा समावेश होता.