साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या ना.गिरीश महाजन गट आणि पारसलाल ललवाणी व सुरेश धारिवाल यांच्या दोन गटाच्या दोन स्वतंत्र वेगवेगळ्या सर्वसाधारण सभा होऊन दोन्ही गटाचे दोन संचालक मंडळ बिनविरोध निवडण्यात आले. गेल्या सात ते आठ वर्षापासून जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीत राजकारण सुरू आहे. त्यामुळे दोन गट पडल्याने दोन्ही गटांचे वाद न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहेत.
सुरेशदादा जैन फार्मसी कॉलेज येथे पारस ललवाणी, सुरेश धारीवाल यांच्या गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यात अध्यक्षपदी पारस झुंबरलाल ललवाणी, सचिवपदी सुरेश मनोहरलाल धारीवाल, सहसचिव राजेंद्र लक्ष्मण पाटील, संचालक म्हणून प्रदीप मोहनलाल लोढा, रमेश बन्सीलाल मंडलेचा, पवन मुलचंद राका, ललित जवाहरलाल भुरट, प्रेमचंद मिश्रीलाल भंडारी, सचिन पंढरीनाथ बसेर, लक्ष्मण बन्सी माळी, कैलास एकनाथ पाटील, शंकर शिवलाल राजपूत, माधव विठ्ठल चव्हाण, अनुज ईश्वरलाल धारिवाल अशा संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ना.गिरीश महाजन गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा धारिवाल कॉलेज येथे घेण्यात आली. त्यात अध्यक्षपदी जितेंद्र बाबुराव पाटील, सदस्य म्हणून जितेंद्र रमेश पाटील, ॲड.शिवाजी माधवराव सोनार, श्रीराम गिरीराज शर्मा, दिलीप विठ्ठल महाजन, छगन शामराव झाल्टे, जगन्नाथ खंडू चव्हाण, वीरेंद्र छोटालाल शहा, महेंद्र केसरीमल नवलखा, मधुकर राजाराम शिंदे, अरुण बाजीराव पाटील, निळकंठ वसंतराव पाटील, आनंदा काशिनाथ बोरसे, चंद्रकांत वामनराव देशमुख, संतोष रामकृष्ण बोरसे यांची निवड केली आहे.