चोपड्यात मल्हारपुऱ्यातील ‘जय भवानी गणेश मंडळ’ अनोख्या सजावटीमुळे अग्रस्थानी

0
2

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

शहरात जनजागृतीचा वसा हाती घेतलेल्या गणेश मंडळांपैकी चोपडा नगरीचा राजा ‘जय भवानी मंडळा’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नुसती गणरायाची स्थापना हा उद्देश डोळ्यांसमोर न ठेवता जनजागृतीचा संदेश सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचवावा, असे प्रबोधनाचे मौखिक कार्य हे मंडळ करीत आहे. यंदा चंद्रयान ३ लॉन्चिंगचे दृश्य हुबेहूब सजावट करून भक्तांना सुखद धक्का दिला आहे. एकंदरीत मंडळाच्या दरवर्षाप्रमाणे अनोख्या सजावटीमुळे भाविक भक्त गणेश दर्शनासाठी तोबा गर्दी करतात.

चोपडा शहराच्या इतिहासातील सर्वात पहिले गणेश मंडळ म्हणून मल्हारपुराचे ‘जय भवानी मंडळा’चे नाव घेतले जाते. या मंडळाने ८३ वर्षापासून गणेशोत्सवाची परंपरा अखंड सुरु ठेवलेली आहे. डेकोरेशनच्या माध्यमातून समाजाला काहीना काही नवीन संदेश देण्याचे काम मंडळ करीत आहे. यावर्षीही नुकतेच चंद्रावर गेलेल्या चंद्रयान ३ लॉन्चिंगचे डेकोरेशन केले आहे. मंडळाचे कार्यकत दीपक भगवंतराव पाटील, महेंद्र रामकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून धर्मेंद्र पाटील, मनिष शिंदे, मयूर पाटील, खिलेश पाटील, रुपेश पाटील, सौरभ पाटील, महेंद्र महाजन, मोहित पाटील आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here