यावल : साईमत लाईव्ह प्रतिनिधी
यावल तालुक्यातील आमोदा येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे किंवा नाही?असा प्रश्न उपस्थित होत असल्याने तसेच पशुवैद्यकीय दवाखाना सतत बंद असल्याने शेतकरी व पशुपालन कर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आमोदा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे परंतु त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसून अनेक दिवसापासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद अवस्थेत आहे त्यामुळे पशुपालन करणारे शेतकरी आणि इतर नागरिकांना गाई,म्हशी,शेळ्या,मेंढ्या,पाळीव कुत्रे इत्यादी प्राण्यांवर,पशुंवर उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तरी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून पशुवैद्यकीय दवाखाना बंद का असतो तिथे पशुवैद्यकीय डॉ.आणि कंपाउंडर, संबंधित कर्मचारी नियुक्त नाही का?याबाबतची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करून आमोदा येथे पशुवैद्यकीय अधिकारी दवाखान्यात हजर राहण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आमोदा ग्रामस्थांकडून होत आहे.