प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी ) चा उद्या जिल्हा मेळावा

0
104

साईमत न्यूज नेटवर्क जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जळगाव जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा  रविवार दि.२१ जुलै रोजी, सकाळी १० वाजता येथील शिरसोली रोडवरील श्रीकृष्ण लॉन मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी ) चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, जळगाव जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक प्रसन्नजीत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.
मेळाव्यासाठी जिल्ह्याचे पदाधिकारी, आजी, माजी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, लोकसभा व विधानसभा क्षेत्रप्रमुख, सहकार क्षेत्रातील मान्यवर, जिल्ह्याचे प्रदेश व महानगरचे पदाधिकारी, तालुका व शहराध्यक्ष, विविध फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष, महिला संघटनेचे पदाधिकारी, युवक व युवती संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांना आमंत्रीत करण्यात आले आहे.
मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी ) च्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतीषअण्णा पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा सरचिटणीस वाय.एस. महाजन, वाल्मिक पाटील यांनी केले आहे.

मेळाव्यात या विषयावर होणार चर्चा
आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकांबाबत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी नियोजनाबाबत मार्गदर्शन करणे, जिल्ह्यातील काही विधानसभा मतदार संघ असतील त्यांची मुख्य कार्यालयात प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येईल.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here