साईमत, जळगाव, प्रतिनिधी
केसीई संस्थेच्या इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांना इन्होवेशन आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी लागणारी एडव्हॉन्स ट्रेनिंग त्यांना मिळावी, तसेच या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, यासाठी आयएमआर आणि जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (जीतो-जिफ) यांच्यासोबत आज एक करार करण्यात आला. इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲंड रिसर्चच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे आणि जीतो इंटरनेशनल इनक्यूबेशन फाउंडेशनचे गव्हर्नर भरत ओसवाल यांच्या स्वाक्षरीने हा करार संपन्न झाला
. यावेळी मंचावर इंस्टीट्यूटच्या वतीने डॉ. वर्षा पाठक, डॉ. पराग नारखेडे, प्रा. पुनीत शर्मा तर जीतो-जीफच्या वतीने जीतो जळगाव युवा शाखाचे अध्यक्ष हरक सोनी, सचिन चोरडिया आणि निखील कोठारी हे उपस्थित होते.
या करारांतर्गत जीतो-जीफ हे आयएमआरच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपचे प्रशिक्षण देतील. त्याचसोबत भारतात होणाऱ्या विविध फंडिंग कार्यक्रमातून त्यांच्या बिजनेस आयडीयाला फंडिंगसुद्धा मिळवून देतील. वर्षभर अनेक कार्यक्रमातून आयएमआर आणि जीतो-जीफ हे दोघे विद्यार्थ्यांच्या व्यापारिक स्कील डेव्हलपमेंटवर कार्यशाळा घेतील आणि त्यातून विद्यार्थी घडवतील. तत्पूर्वी भरत ओस्वाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना स्टार्टअप याविषयावर मार्गदर्शन केले.
आयएमआरच्या संचालिका यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि इन्होवेशनद्वारे स्वतःसाठी आणि देशहितासाठी मेहनत घेऊन उत्कृष्ट कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचा सल्ला त्यांनी आपल्या संवादातून केला. आभार आणि प्रास्ताविक ट्रेनिंग ॲंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा यांनी केले. यावेळी एमबीए आणि बीसीएचे एकूण ९५ विद्यार्थी उपस्थित होते.