चारित्र्याच्या संशयावरून  पतीने केला पत्नीचा खून

0
11
साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधीचारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईलच्या चार्जरच्या वायरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वडाळा गावात उघडकीस आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,  नाशिक जवळील वडाळा गावात मदिना लॉन्स मागे तब्बसूम बिल्डिंग जवळ रिजवान पठाण (वय ३४ ) हा त्याची पत्नी व मुलांसह राहत होता. रिजवान हा वारंवार त्याची पत्नी निनाज रिजवान पठाण हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करत होता. काल (दि.१४) रात्री दोन ते पाच वाजेच्या दरम्यान, रिजवान याने घरातील मोबाईलच्या चार्जरच्या सहाय्याने रिजवान याने पत्नी निनाजचा गळा आवळून खून केला.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिजवान याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here