Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»…. म्हणून यांचे आस्तित्व बुडाले ; मनसेने व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा डिवचले
    मुंबई

    …. म्हणून यांचे आस्तित्व बुडाले ; मनसेने व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा डिवचले

    SaimatBy SaimatJuly 26, 2022Updated:July 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    राज्यातल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची ‘सामना’साठी (Saamana)कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीत ठाकरे यांनी राजकीय घडामोडीवर भाष्य करत बंडखोरांवर निशाणा साधला. आज आणि उद्या ही मुलाखत प्रदर्शत होणार आहे. या मुलाखतीवर मनसेने (MNS)व्यंगचित्राच्या माध्यमातून सडकून टीका केली आहे.

    “साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”, असे म्हणत मनसेने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.

    मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. या चित्रात मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे. “हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तरं, असे संजय राऊत उद्धव ठाकरेंना म्हणताना दिसत आहे. त्यावर बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं, असे उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या संभाषणावेळी संजय राऊतांच्या हातात घड्याळ आहे. मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शरद पवार बोलतील तसंच वागत असल्याची टीका मनसेकडून वारंवार करण्यात येत आहे, हे विशेष. मनसेच्या या व्यंगचित्रावर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते याकडे पाहावे लागेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.