हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालय बंद

0
1

साईमत लाइव्ह यावल प्रतिनिधी
हतनूर पाटबंधारे उपविभागातील यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाडळसे शाखा बंद आहे का असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांना पडला आहे.

जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रातील हतनूर पाटबंधारे उपविभाग यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाटबंधारे विभागाने पाडळसे शाखा बंद केली आहे का इत्यादी अनेक प्रश्न संबंधित शेतकरी आणि नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहे पाडळसे शाखा कार्यक्षेत्रात सिंचन क्षेत्रावर नियंत्रण कोणाचे? संबंधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शाखा अभियंता शेतकऱ्यांना कुठे भेटतात याबाबतची चौकशी जळगाव पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांनी करून पाडळसे शाखा तात्काळ सुरू करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here