माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली वाहिली
साईमत/ जामनेर /प्रतिनिधी :
भारतरत्न तसेच माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवनिर्वाचीत लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांनी स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहिली आणि त्यांना आदरांजली व्यक्त केली. अभिवादन समारंभात शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, तालुकाध्यक्ष मयुर पाटील, कमलाकर पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, दीपक तायडे, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, मुकुंदा सुरवाडे, आतिष झाल्टे, दत्तू जोहरे, श्रीराम महाजन, सुहास पाटील, प्रल्हाद सोनवणे, दीपक महाराज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांना व कार्याला अभिवादन केले.
