Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील
    धरणगाव

    निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    आपत्तीच्या काळातही निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबानी स्वत: खंबीर होऊन आपल्या पुढच्या पिढीतील लेकरांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवून कुटुंबावरच हे सावट दूर करणे आवश्‍यक आहे. आपल्यासोबत आम्ही आहोत, निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

    धरणगाव तालुक्यातील तीन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २१ महिला आणि पुरुषांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील २१ व्यक्तींना प्रत्येकी २० हजार याप्रमाणे चार लाख २० हजाराचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्याबाबतचे धनादेश पात्र उपस्थित लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. त्यातील पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ देण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महसूल विभागाला दिले. धरणगाव नगरपालिका सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    कार्यक्रमाला नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, सी. बी. देवराज, महसूल सहायक गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, विजय महाजन, वासुदेव चौधरी, प्रिया इंगळे, भारती चौधरी, पुष्पा पाटील, रवींद्र कंखरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविकात नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी योजनेची माहिती विशद केली. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कंखरे तर आभार गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मानले.

    तालुक्यातील पात्र २१ लाभार्थ्यांना लाभ

    राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पात्र लाभार्थी असे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पात्र लाभार्थी असे आम्रपाली साळुंखे (पाळधी खु.), कोकिळाबाई कुंभार, मंगलाबाई जोशी, (पाळधी बु.), संगीता मोरे, रंजनाबाई पारधी, कल्पना मोरे, (धरणगाव), मंगला मोरे, यमुनाबाई मोरे, (साळवा), उषाबाई पाटील (हिंगोणे बु.), सुमन मोरे (खर्दे बु.), रेखा पाटील (कल्याणे खु.), अलकाबाई पाटील (आव्हाणी), भारती शिरसाट, पूनम मिस्तरी (वाघळुद खु.), अलकाबाई पाटील (धार), ललिता पाटील (भवरखेडा), मिनाबाई गोधळे (गारखेडा), जयश्री खैरनार (शेरी), सखुबाई भिल (दोनगाव बु.), देवकाबाई भिल (कल्याणे बु.), संगीता कोळी (रोटवद), असे पात्र लाभार्थी आहेत. त्यातील उपस्थितांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon: धरणगाव तालुक्यातील नाले आणि बंधारे सुधारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम

    March 2, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.