साईमत न्यूज नेटवर्क –
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम झाला असून बाजारात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
जळगावच्या सुवर्णनगरीत आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याच्या किमतीत १ हजार रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचा दर १ लाख ४४ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सुमारे १४ लाख ४० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
चांदीच्या दरातही वाढ झाली असून १ किलो चांदीच्या किमतीत २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर २ लाख २७ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याच्या दरात ९३० रुपयांची वाढ झाली असून १ तोळा सोन्यासाठी १ लाख ४५ हजार ८६० रुपये मोजावे लागत आहेत. १० तोळे सोन्याचा दर १४ लाख ५३ हजार ६०० रुपयांवर पोहोचला आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली असून १ तोळा सोन्याची किंमत १ लाख ३३ हजार ७०० रुपयांवर गेली आहे. तर १० तोळे सोन्यासाठी ग्राहकांना १३ लाख ३७ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
सोन्या-चांदीच्या वाढलेल्या दरामुळे लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे. दरवाढीमुळे अनेक ग्राहकांनी सध्या खरेदी पुढे ढकलल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.
