गिरीश महाजनांमध्ये समोरून सरळ सामना करण्याची ताकद नाही – एकनाथ खडसे

0
36

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :

भाजपनेते  गिरीश महाजन  यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  यांच्यावर टीका केली होती. एकनाथ खडसेंना जावयासोबत जेलमध्ये जावे लागेल, असे विधान गिरीश महाजन यांनी केले होते. आता खडसे यांनीदेखील त्यावर चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, गिरीश महाजनांमध्ये समोरून सरळ सामना करण्याची ताकद नाही. मला वेगवेगळ्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न हा आजचाच नाही, तर पूर्वीपासून ते प्रयत्न सुरू आहे. झोटिंग, अँटी करप्शन विविध माध्यमातून चौकशी झाल्या; परंतु कुठलाही तथ्य समोर आलेला नाही. असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणालेत, आता ईडी याची चौकशी करतेय, त्यातही एकाच प्रकरणाच्या वारंवार चौकशा केल्या जात आहेत. माझ्यावरील षडयंत्र राजकीय आकसापोटी, राजकीय सूड सुरू आहे. असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. लंडनमध्ये माझ्या जावयाकडे स्वतः गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवस घरी राहून जेवण केले होते. त्यांच्या घरचे मीठ खाल्ले. आणि त्यांना ईडीमध्ये अडकून उपकार केले. काहीतरी शोधा आणि नाथाभाऊंना तुरुंगात टाका, हा एकमेव हेतू यांचा सुरू आहे. अशी टीका एकनाथ खडसे यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here