अन्न, पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके प्रात्यक्षिक

0
21

अन्न, पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके प्रात्यक्षिक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींच नियोजन करण्यात आलेले आहे. या करिता चालू वर्षी हरभरा, गहू, जवस, करडई, भूईमुग, व मोहरी या पिकांचे महा-डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पीक प्रात्याक्षिके हि बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत.

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणा-या बियाण्याचा २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे.

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जात ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर २८ सप्टेंबर, २०२४ ते ६ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील, तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनीmahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊ ऑनलाईन अर्ज करावेत, व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here