माजी खा.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुस्तक विमोचन सोहळ्याला माजी खा.डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील यांची उपस्थीती

0
43

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे आणि डॉ.सच्चिदानंद जोशी यांनी संपादित केलेले कनेक्शन थ्रु कल्चर ॲन ओव्हरव्हूय ऑफ इंडियाज सॉफ्ट पॉवर स्ट्रेन्थ या पुस्तकाचा नुकताच नवी दिल्ली येथे विमोचन सोहळा थाटात पार पडला.

नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन, चाणक्य पुरी येथे बुधवार, दि.13 जुलै 2022 रोजी अनावरण सोहळा आयोजित केला होता. याचे विशेष पुस्तक विमोचन सोहळा केरळचे महामहिम राज्यपाल असिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारताचे विदेश मंत्री डॉ.एस.जयशंकर हे उपस्थित होते. नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास केंद्र सरकार मधील अनेक मंत्री, खासदार, ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक बुध्दीजीवी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here