श्रीमद् भागवत सप्ताह कथेचे कथावाचक शास्त्री भक्तीस्वरूपदासजी यांचे सत्संगात आवाहन
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी
परीक्षितेची कथा सांगत असताना परीक्षिताने एखाद्या साधू महात्म्याचा विनाकारणाने मान सन्मानासाठी अपराध केला आणि म्हणून त्याला शाप घडला. परंतु शेवटी शुकदेवजी महाराज यांच्या मुखाने कथा श्रवण केली. सत्संग घडला. म्हणून सात दिवसांमध्ये त्याचाही मोक्ष झाला. म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये प्रतिदिन सत्संग करावा, असे आवाहन स्वामी भक्ती स्वरूपदास यांनी केले. ते येथील डी.एच. जैन विद्यालयाच्या मैदानावर स्वामीनारायण मंदीर कोरपावलीद्वारा आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहात बोलत होते.
सप्ताहास २९ नोव्हेंबर रोजी सुरुवात केली असून ५ डिसेंबर रोजी कथेची सांगता होणार आहे. कथा सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होत आहे. कथा वाचन स्वामी भक्ती स्वरूपदास शास्त्री निरूपण करीत आहे. येथून जवळच असलेल्या कोरपावली येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत सप्ताह कथेच्या द्वितीय दिवशी वक्ता शास्त्री भक्तीस्वरूपदासजी यांनी भगवान श्रीकृष्णद्वारा पांडवांसाठी त्यांच्या हक्काचे पाच गाव मागणीचा संधी प्रस्ताव हस्तीनापुर धृतराष्ट्राकडे ठेवला. या कथेस प्रारंभ केला.
कथेच्या माध्यमातून समाजामध्ये सुद्धा जर आपल्या हक्काचं नसेल तर ते आपण कधीही घेऊ नये व दुसऱ्याच्या हक्काचे त्याला परत करावे. भावाभावामध्ये थोड्याफार शेतानिमित्त घरदारा निमित्त भांडणे होत असतात ते होऊ नये. कारण शेवटी रक्ताची नातीच आपली असतात. त्याची जोपासना आपण स्वतःच करायला पाहिजे. जर ते आपण नाही करू शकलो तर भगवान सुद्धा ते मान्य ठेवत नसतो. शेवटी युद्धाच्या माध्यमातून दुर्योधन, दुशासन, कर्ण, शकुनि इत्यादीचा वध झाला म्हणून प्रत्येकाने धर्ममय जीवन जगावे.
शेवटी ध्रुवचरित्राची सुंदर कथा झाली. त्यामध्ये वेशभूषा सुद्धा सजवण्यात आलेली होती. ते वेशभूषा बघून सर्वांचे मन आनंदित झाले व आकर्षित झाले. त्यामुळे कथेला गर्दी आता हळूहळू होऊ लागली. ध्रुव बाळ जरी लहान असले तरी तो तप करून स्वतः नक्की केलेले स्वतःचे मनोरथ पूर्ण करू शकला. त्याचप्रमाणे आजची युवा पिढी जर नक्की करेल आणि प्रयत्नशील होणार, कार्यशील होणार. तर कोणतेही कार्य ते करू शकत असतात. म्हणून समाजातील नवयुवकांनी निष्क्रियता, आळस सोडून कामाला लागायला पाहिजे. जेणे करून व स्वतःचा परिवार सुखी होणार असा शुभ संदेश दुसऱ्या दिवसाच्या कथेच्या माध्यमातून वक्ता श्री भक्तीस्वरूपदासजी यांनी दिला. सूत्रसंचालन सावदा गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री अनंत प्रकाशदासजी यांनी केले.