पालमधील आदिवासी पाड्यावर दिवाळीचे साहित्य वाटप करून घेतला आनंद

0
10

जामनेरातील गुरूदेव सेवा आश्रमचे श्याम चैतन्य महाराज यांच्या उपक्रमाचे कौतुक

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

येथील गुरूदेव सेवा आश्रम ट्रस्ट चैतन्य धामचे संस्थापक श्याम चैतन्य बापुजी महाराज यांच्या विचार संकल्पनेतून काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सातपुड्याच्या कुशीतील एका आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील लहान थोरांसोबत राहून दिवाळीचा आनंद घेतला. दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा विजयाचे आणि अज्ञानावर ज्ञानाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.

आज शहरी व ग्रामीण भागात प्रत्येक घराघरात नवचैतन्य व आनंद निर्माण करणारा दिवाळीचा सण आहे. मात्र, आजही डोंगर, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारे आदिवासी बांधव व त्यांचा परिवार या सणापासून कोसो दूर आहे. या परिवारांच्या आयुष्यात दिवाळी हा सण नावापुरताच आहे. जामनेर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे गादीपती परम पूज्य श्याम चैतन्यजी महाराज व चैतन्य युवा सेवा संघ यांनी पाल घाटातील २५ ते ३० आदिवासी कुटुंबाच्या वस्तीत जाऊन त्यांना दिवाळीचा फराळ तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत रेडिमेट कपडे, साडी चोळी, शर्ट पॅन्ट व इतर गृहोपयोगी वस्तू अशा साहित्याचे वाटप केले. त्यामुळे थोडे का होईना पण त्या परिवारांच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुखाची अनुभूती पहायला मिळाली.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला डॉ.सुभाष पवार, किशोर भाऊ, दिलीप नाईक, नटवर चव्हाण, चिंतामण राठोड, उदय नाईक, दिलीप चव्हाण, सुधाकर पवार, शत्रुघ्न चव्हाण, दीपक चव्हाण, दिलीप पवार, अविनाश पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here