निंभोरा पोलीस ठाण्यातील नऊ पोलिसांची बढती

0
3

सावदा,ता.रावेर : वार्ताहर
येथून जवळील निंभोरा येथील पोलीस ठाण्यातील नऊ पोलिसांची पदोन्नतीवर बढती झाली आहे. चार पोलीस नाईक कॉन्स्टेबल यांची हवालदार पदावर बढती झाली आहे. त्यात स्वप्निल सुधाकर पाटील, नितीन कृष्णा पाटील, अनिल नथू साळुंखे, जाकीर रफिक पिंजारी यांचा समावेश आहे. त्यांना बढतीचे प्रमोशन मिळाल्याने त्यांना प्रमोशनची फित येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, फौजदार काशिनाथ कोळंबे, फौजदार राका पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.
यापूर्वीही पाच पोलीस हवालदारांचीही बढती झाल्याने ते सहाय्यक फौजदार पदावर सहाय्यक कामकाज करीत आहे. त्यात शेख अशरफ शेख अहमद, बाळकृष्ण मुकुंदा पाटील, विकास कृष्णा कोल्हे, विलास बालकराम झांबरे, ज्ञानेश्वर मधुकर पाटील यांचा सहभाग आहे. याबद्दल बढती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड गावातील मान्यवर, शालेय शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here