साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहर लगत असलेल्या बांभोरी पुलाचे समांतर रस्ते सह बंधारा बांधण्याची प्रशासकीय मान्यता असताना सुद्धा फक्त पुलाचे बांधकामाचे टेंडर निघाल्याने त्यावर आवश्यक तो निधी वाढवून पूलासह बंधाऱ्याचे बांधकाम व्हावे यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली.
शासकीय विश्रागृह येथे रविवारी झालेल्या बैठकीत कृती समितीची स्थापना करण्यात आली. हि कृती समिती पूलासह बंधाऱ्याचे बांधकाम व्हावे यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करणार आहे. पूर्वीची समांतर रस्ते कृती समिती हीच बांभोरी पुल – बंधारा कृती समिती म्हणून कार्यरत आहे.
बैठकीला माजी महापौर तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मनपा माजी विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, मनसे जिल्हा प्रमुख जमील देशपांडे, भाजपचे डॉ. राधेश्याम चौधरी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे विनोद देशमुख, सरिता माळी – कोल्हे, अॅड. राजेश झाल्टे, शिवराम पाटील, बंटी जोशी, आशुतोष पाटील, फारुक शेख आदिंची उपस्थिती होती.
सोमवारी देणार निवेदन
सार्वजनीक बांधकाम अधीक्षक अभियंता यांना २० नोव्हेंबर सोमवारी सकाळी ११ वाजता निवेदन देणार असून त्याच्या प्रती पालक मंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांना देणार असल्याने कृती समिती सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन समिती तर्फे फारुक शेख यांनी केले आहे.