शेंदुर्णीत दहीहंडी उत्सव मंडळाकडून धामधुमीत दहीहंडी उत्सव साजरा

0
4

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील शेंदुर्णी येथे ३९ व्यावर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या धामधुमीत उत्साहात साजरा झाला. दहीहंडीची विधीवत पूजाअर्चा आरती पहुर दरवाजा समोरील हनुमान मंदिरात करण्यात आली. दहीहंडीचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, तालुकाप्रमुख ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, डॉ.नीलमकुमार अग्रवाल, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, डॉ.सागर गरुड, दगडू पाटील आदींनी केले.

दहीहंडीची मिरवणूक गोपाळपूर येथील दहीहंडी फोडण्यासाठी गेली. त्यानंतर वाडी दरवाजा, गांधी चौक, अग्रसेन चौक, पारस चौक, कुमावत गल्ली, कुंभार गल्ली, पहुर दरवाजा, हनुमान मंदिर व इतरही ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीच्या गोपालांनी दहीहंड्या फोडल्या. ‘गोपाला रे गोपाला’ या गाण्यांवर तरुण, गोपालांनी नृत्य सादर करून दहीहंडीची शोभा वाढविली. जयंती पूजनानंतर मान्यवरांचा सत्कार गोपाल पथकाने केला.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी शिवसेना शहरप्रमुख संजय सूर्यवंशी, युवा सेना अधिकारी अजय भोई, युवराज बारी, कैलास काबरा, शेतकरी नेते सुनील अग्रवाल, बारकू जाधव, अशोक बारी, विठ्ठल बारी, अमरीश गरुड, विठ्ठल गरुड, सोनू भोई, नगरसेवक शरद बारी, ऋषिकेश अग्रवाल, संदीप बारी,महेंद्र गुजर, तुकाराम पाटील, विशाल शिंपी, निलेश गुरव, सचिन कुमावत, सुनील अग्रवाल, सुशील अग्रवाल यांच्यासह सर्व गोपालांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here