बोदवड तालुक्यात रासायनिक खते उपलब्ध नसल्याचा परिणाम

0
20

यावल  : साईमत लाईव्ह प्रतिनिधी 

बोदवड शहरात रासायनिक खतांचा अनियमित पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे.यासाठी राष्ट्रवादी तर्फे तहसीलदार व कृषी अधीकाऱ्यांकडे रासायनिक खत उपलब्ध व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनात बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून तालुक्यात कोणत्याच प्रकारचे खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.बोदवड तालुक्यातील काणत्याही कृषि केंद्रावर खतं उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला अजून त्याची खतांअभावी धावपळ होत आहे.

तरी आपणास विनंती करत आहे की,सदरील बाब लक्षात घेता आपण आपल्या स्तरावरून शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपले स्तरावरून योग्य ते सहकार्य करून येत्या २ ते ३ दिवसात रासायनिक खते उपलब्ध करून मिळावी अशी मांगणी निवेदनाद्वारे केली.

निवेदन देताना उपस्थित राष्ट्रवादी किसान सेल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष वामनराव ताठे,नगरसेवक भरत अप्पा,राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष आबा पाटील,माजी सभापती किशोर गायकवाड़,राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर,मधुकर भाऊ राणे,डॉ.सेलचे डॉ. काजळे,संजय भाऊ वराडे,जीवन राणे,रविंद्रभाऊ खेवलकर,मधुकर पाटिल,नईम खान बागवान,विजय चौधरी,किरण वंजारी,फिलाभाई राजपूत,लतीफ शेख,अनंदा पाटील यांच्या सहित राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here