अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी

0
26

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना उबाठाच्यावतीने बुधवारी, २९ नोव्हेंबर रोजी तहसीलदार राजेश सुरळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या कपाशी, तूर, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राजेश सुरळकर यांच्याकडे केली आहे. शिवसेनेच्या रास्त मागणीची दखल घेत तात्काळ तिन्ही मंडळातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना पंचनामे करण्याचे आदेशित केल्याचे तहसीलदार राजेश सुरळकर यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

निवेदनावर शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुकाप्रमुख दीपक चांभारे (पाटील), शिवसेना उपशहरप्रमुख शकील जमादार, शे.समद कुरेशी, किसान सेनेचे तालुकाप्रमुख महादेव पवार, शहरप्रमुख सै.वसीम, युवासेनेचे शहरप्रमुख पवन गरुड, वाहतुक सेनेचे शहरप्रमुख इमरान लकी, कामगार सेनेचे तालुकाप्रमुख राम थोरबोले, कामगार सेनेचे शहरप्रमुख हरिदास गणबास, रामराव तळेकर, चांद चव्हाण, रिझवान शाह, आसीफखान, नावेदखान, राजेंद्र काजळे, अजय सोनोने, विजय झांबरे, बाळूभाऊ धामोडे, सत्तार शाह, जावेद खान, नासीरशेख, मुस्ताक पठाण, मो.मोबीन यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here