Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»एरंडोलला मतदार जनजागृती सायकल रॅलीत जिल्हाधिकाऱ्यांचाही सहभाग
    एरंडोल

    एरंडोलला मतदार जनजागृती सायकल रॅलीत जिल्हाधिकाऱ्यांचाही सहभाग

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे विविध माध्यमातून कार्यक्रम सुरु आहेत. अशातच एरंडोल येथे रविवारी, ३१ मार्च रोजी सकाळी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. त्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वत: सायकल घेऊन रॅलीत उत्साहात सहभागी झाले होते. त्यामुळे इतरांमध्ये उत्साह निर्माण झाला.

    एरंडोल तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले पुतळा, नागोबा मढी, मारवाडी गल्ली, भगवा चौक, मेन रोड (बाजार पेठ) मार्गे तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच विविध ठिकाणी थांबून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यांना मतदान करायला सांगून इतरांनाही प्रेरीत करण्याचे आवाहन केले.

    रॅलीत उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, पोलीस निरीक्षक संतोष गोराडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, किशोर चव्हाण, मुख्याधिकारी, न. प. पारोळा, राजेंद्र महाजन, गटशिक्षणाधिकारी, तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी दिलीप पाटील, नायब तहसीलदार, बी.एस. भालेराव, नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Shirsoli : शिरसोलीत अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

    March 24, 2026

    Bhusawal : भुसावळात कचऱ्याला आग; प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला

    March 24, 2026

    Chop : अनेर नदीत धाडसी उडी ओम पाटीलने वाचवले चौघांचे प्राण

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.