टाकळी शाळेत शिक्षक दिनासह स्वच्छता पंधरवडा दिन साजरा

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील टाकळी माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. जि.प.शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्यावतीने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुभाष माळी होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुपडू सोनार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल महाले, सुपडू बावस्कर, उपसरपंच हिंगणे बु., विनोद पाटील, भानुदास चव्हाण, विशाल माळी, सुरेश माळी, ईश्वर परदेशी यांची उपस्थिती होती.

यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाटील, शिक्षक नागनंदा मघाडे, किशोर जगताप, माधुरी येंडोले, साजिस तडवी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती राजपूत, संदीप सोनार, सुनीता सोनवणे, रजनी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असल्याने त्यानिमित्त सूपडू बावस्कर यांनी विद्यालयातील स्वच्छतेसाठी विद्यालयास दोन मोठ्या कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे स्वच्छतेस हातभार लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here