साईमत जळगाव प्रतिनिधी
आज केमिकल शेती मुळे मानवाला विषाक्त भोजन खायला मिळत आहे. मोबाइला टॉवरमुळे शहरात पक्षी दिसेनासे झालेले आहे, पक्षांमध्ये सर्वात अधिक फटका बसला तो कावळ्यांना, म्हणून आज कावळे दिसेनासे झालेले आहे, त्यामुळे पितृ पक्षात कावळ्याला भोजन दिल्याशिवाय लोकांना भोजन ग्रहण करावे लागत असल्याचे प्रतिपादन कृषी विभागाच्या आत्माचे रिटायर्ड डेप्युटी डायरेक्टर अनिल भोकरे यांनी केले.
केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट विभागातील – ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत “कृषी पर्यावरण आणि शासन धोरण” या विषयावरील सेमिनार प्रसंगी ते बोलत होते.
या सेमिनार मध्ये अनिल भोकरे यांनी पर्यावरणातील बदलामुळे शेतीवर, मानवावर आणि प्राण्यांवर होणारे भयानक दुष्परिणाम, हवामान परिवर्तनशीलता, गेल्या दशकात तीव्र आणि आवर्ती दुष्काळ, दीर्घकाळ कोरडे पडणे आणि उच्च तीव्रतेचा पाऊस, मान्सून उशिरा सुरू होणे आणि लवकर माघार घेणे, गारपीट आणि अवकाळी पाऊस, दीर्घकालीन हवामान बदल, NAPCC आणि MSAAPCC ने शेतीवर प्रतिकूल परिणामांचा अंदाज वर्तवला आहे. GoI ने NMSA लाँच केले, हवामानातील भेद्यता आणि बदलांविरुद्ध शेतकऱ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी GoM आणि WB चा पुढाकार, जागतिक हवामान अजेंडासाठी वचनबद्धता याबाबत विस्तृत माहिती दिली.
श्री भोकरे पुढे म्हणाले की, गल्ली मधील कुत्रे नालीचे पाणी पित असल्याने त्यांना शरीरावर खाज येते, कारण नालीच्या पाण्यात लीड, आर्सेनिक असते यामुळे आता केवळ घरातील पाळीव प्राणीच सुरक्षित आहे. गल्लीतील कुत्रे त्वचा रोगांमुळे बाधित झाले आहे. याची प्रत्येक नागरिकाने दाखल घ्यायला पाहिजे आणि हे होऊ नये यासाठी पक्ष्यांसाठी, गल्लीतील प्राण्यांसाठी पिण्यासाठी स्वच्छ भांडे भरून ठेवायला पाहिजे अशी विनंतीही त्यांनी केली.
यावेळी डॉ. श्रीकांत तारे, प्रा.रवींद्र स्वामी विभाग प्रमुख, एमबीए ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट, प्रा. मयूर बोरसे, प्रा.निकिता बालानी उपस्थित होते. सूत्र संचालन विध्यार्थी यश चौधरी याने, तर आभार प्रदर्शन प्रा.निकिता बालानी यांनी केले.