केंद्र सरकार इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचे फोन हॅक करण्याच्या प्रयत्नात?

0
1

नवीदिल्ली : वृत्तसंस्था

इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचे फोन केंद्र सरकार हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे इशारेवजा संदेश ॲपल कंपनीकडून या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत. “कदाचित राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमचे आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात, त्यामुळे हे हल्लेखोर तुमचे फोन हॅक करण्याची शक्यता आहे”, असे मेसेज या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या महुआ मोईत्रा, काँग्रेस खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आदींचा समावेश आहे.या नेत्यांनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भातले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

नेमकं काय घडतंय?
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सध्या ‘कॅश फॉर ोश्चन’ प्रकरणात आरोप होत आहेत. या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असतानाच महुआ मोईत्रांनी मंगळवारी सकाळी ॲपलकडून आलेला इशारा देणारा संदेश पोस्ट केला. महुआ मोईत्रा या आयफोन वापरत असून सरकार पुरस्कृत हॅकर्सकडून आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा हा इशारा होता. असाच संदेश काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेरा, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनाही आले आहेत.

काय आहे या संदेशात?
प्रियांका चतुर्वेदींनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये हा मेसेज सविस्तर दिल्याचे दिसत आहे. “ॲलर्ट सरकार पुरस्कृत हल्लेखोर कदाचित तुमचा फोन हॅक करत आहेत. आम्हाला अशी शक्यता वाटत आहे. आम्हाला वाटतंय की, तुमच्या ॲपल आयडीशी संलग्न आयफोन त्रयस्थ ठिकाणी बसून हॅक करण्याचे प्रयत्न सरकारकडून मदत मिळणारे हॅकर्स करत आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे करता, त्यामुळे तुमचे फोन हॅक करण्याचे प्रयत्न होत आहेत.जर हे हल्लेखोर यशस्वी झाले, तर ते कुठेही बसून तुमच्या फोनमधील संवेदनशील माहिती, संदेश किंवा अगदी कॅमेरा आणि मायक्रोफोनशीही छेडछाड करू शकतात. अर्थात, हेही शक्य आहे की हा ॲलर्ट चुकीचा असेल पण तो गांभीर्यानं घ्यावा अशी तुम्हाला विनंती आहे”, अंसं या संदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here