साईमत जळगाव प्रतिनिधी
मारुती पेठेतील युवा मारुती पेठ मित्र मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वधर्मसमभाव विषयावर आधारित आरास सादर केली आरासचे सादरी करण मानसी पाटील, केशव पाटील, यश सोनार, ध्रुव वाणी, पियुष कासार, भावेश शिंपी यांनी केले.
यंदा मंडळाचे ४८ वे वर्ष होते सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू असलेल्या या मंडळाने मागील कालखंडात देखील ज्वलंत विषयावरील तसेच विविध प्रकारचे समाजप्रबोधनात्मक सजीव आरास सादर करून आजपर्यंत सामाजिक एक रुपयाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला आहे.
बाप्पाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांच्या तालावर बालगोपालांसह ज्येष्ठ तसेच मुली व महिलांनी देखील लेझीम खेळूनगणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी ८ वर्षाचा चिमुकला कृष्णा सोनवणे याने एकाच वेळेस दोन्ही हातात काठी घेऊन काठी फिरवण्याची कसरत प्रत्येक चौका चौकात दाखवून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.



