अण्णाभाऊ साठेसह समाजसुधारकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा

0
3

मलकापूर : प्रतिनिधी

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले. तेव्हा अण्णाभाऊसह समाजसुधारकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.मुकुल वासनिक यांनी केले. लोणार येथील श्री मंगल कार्यालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संकल्प सभेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फॉर्मचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑगस्ट रोजी संकल्प सभा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे आयोजन साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांनी केले होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष साहेबराव पाटोळे होते.

व्यासपीठावर आ.राजेश एकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, दीपक काटोले, बुलढाणा काँगेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, नरेंद्र खेडेकर, रेखा खेडेकर, डॉ.अरविंद कोलते, जालिंदर बुधवंत, संजय राठोड, लक्ष्मणराव घुमरे, रशीद खा जमादार, ज्ञानेश्वर पाटील, स्वाती वाकेकर, कासमभाऊ गवळी, अनंत वानखेडे, जयश्री शेळके, रामविजय बुरुंगले, मनोज कायंदे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, नगराध्यक्ष पूनम पाटोळे चव्हाण, संतोष आंबेकर, नंदा टापरे, विनोद जोगदंड, राजेश मापारी, पराग कांबळे, सुहास चवरे, राजू पाटील, शिरीष डोरले, ज्ञानदेव तायडे, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते सीताराम तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यांनी व्यक्त केले मनोगत

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, आ. राजेश एकडे, नगराध्यक्ष पूनम पाटोळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दीपक काटोले, उपाध्यक्ष संजय राठोड, सरचिटणीस श्याम उमाळकर, सचिव दादू शेठ, सरचिटणीस रामविजय बुरुंगले, सचिव स्वाती वाकेकार, सरचिटणीस जयश्री शेळके, पक्षनेते लक्ष्मण घुमरे, जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना नरेंद्र खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर, साहेबराव पाटोळे, संतराम तायडे, कासमभाई गवळी, अनंत वानखेडे, मनोज कायंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

चांदीचे मुकुट भेट देऊन सत्कार

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम आणि मलकापूर विधानसभा काँग्रेसच्यावतीने मुकुल वासनिक यांचा चांदीचे मुकुट भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र प्रदेशचे शांताराम तायडे, बी.के. खरात, राजेंद्र वानखेडे, लक्ष्मण गवई, निवृत्ती तांबे, सोपान पानपाटील, भगवान गायकवाड, दिगंबर अंभोरे, राजू नाडे, किसन बाजार, प्रभाकर दोघे, सुरेश मानवतकर, कृष्णा नाटेकर, भास्कर आगाम, सुरेश वानखेडे, विजय सकळकर, मेजर आव्हाड, मंगला,निकाळजे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मातंग समाजाचे दिवंगत नेते मधुकर कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर राष्ट्रगीतान कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मातंग समाज महिला, नागरिक, युवक यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र काळे यांनी तर आभार राजेंद्र वानखेडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here