लखनाैहून आणलेल्या 60 हजार कुत्ता गाेळ्यांचा साठा मालेगावमध्ये जप्त नाशिक ( प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेशच्या लखनौमधून नशेच्या औषधांची तस्करी करत मालेगावात विक्रीचे रॅकेट चालवणारा भिवंडीचा संशयित माेहंमद अयाज निसार अहमद अन्सारी (४८) याला पवारवाडी पाेलिसांनी अटक केली. शहरात वाढती नशेखाेरी गुन्हेगारीचे मूळ ठरत असल्याने पाेलिसांनी नशेचा बाजार मांडणाऱ्यांना रडारवर घेतले आहे. मागील कारवायांच्या चाैकशीत याचे धागेदाेरे भिवंडीपर्यंत पाेहाेचले हाेते. अपर पाेलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी संशयित अयाजच्या हालचालींवर लक्ष ठेवले हाेते. अयाज हा शहरातील अकरा हजार काॅलनीत खाेली घेऊन वास्तव्य करत हाेता. शनिवारी रात्री ताे कुत्ता गाेळ्या विक्रीच्या हेतूने ओवाडी नाला परिसरात फिरत हाेता. त्याच्याजवळील बॅगेत साठा असल्याची खात्री…
Author: Vikas Patil
एचएएलच्या नवा नियमामुळे नाशिकच्या विकासावर टाच? नाशिक ( प्रतिनिधी ) – गांधीनगर विमानतळ आणि आर्टिलरी सेंटरच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, नाशिकमधील निम्म्या भागातील बांधकामांवर मर्यादा येणार आहेत. यापूर्वी नाशिकरोड आणि देवळाली परिसरात पाच किलोमीटरपर्यंत उंच इमारती बांधण्यावर निर्बंध होते. आता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने ओझर विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघातील बांधकामांसाठी नव्या अटी घालून दिल्या आहेत. या क्षेत्रातील उंच बांधकामे हवाई वाहतुकीस अडथळा ठरू शकतात, हे लक्षात घेता एचएएलकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक महापालिका आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला पाठवले आहे, त्यामुळे बांधकाम व्यवसायात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे…
डॉ. अनिकेत पाटील यांचे एमसीएच न्युरोसर्जरीत यश जळगाव (प्रतिनिधी)- गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. वर्षा पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च एमसीएच न्युरोसर्जरीची पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे वैद्यकीय जगात नव्या, कुशल न्युरोसर्जनची भर पडली आहे. डॉ. अनिकेत पाटील यांनी शैक्षणिक प्रवासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी पुण्यातील काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि जनरल सर्जरीमध्ये एम एस ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला तेथे त्यांनी न्युरोसर्जरीमध्ये एमसीएचची पदवी पूर्ण केली. हे यश त्यांनी परिश्रम, दृढसंकल्प आणि वैद्यकीय क्षेत्राप्रती असलेल्या निष्ठेच्या…
नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळीचा तडाखा नाशिक (प्रतिनिधी )- जिल्ह्यातील मनमाड, पानेवाडी परिसरात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी परिसरात आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अनपेक्षित हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संकट घेऊन आला आहे.पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. कांदा बियाण्यालाही मोठा फटका बसला आहे. यासोबतच आंबा बागांमधील फळांचे देखील नुकसान झाले आहे.शेतकरी आधीच उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावाची अनिश्चितता यामुळे चिंतेत असतात. त्यातच निसर्गाच्या या आणखी एका तडाख्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करावा.…
शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकासासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे अभ्यासक्रम तयार करा- अजित पवार मुंबई (प्रतिनिधी)- शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकाससारख्या क्षेत्रांसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करा.मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कृत्रिम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धी सहकार्यात उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समन्वयकाची भूमिका बजावावी या क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. या क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि शासकीय विभागांनी चर्चा करुन अभ्यासक्रम तयार करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन करण्यासह…
खरीपपूर्व कृषी निविष्ठा कार्यशाळा जळगाव (प्रतिनिधी )- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांनी सहभाग घेतला. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पदमनाथ मस्के यांनी प्रस्तावना केली, माती परीक्षण आणि जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर कसा करावा, बियाण्यांवर प्रक्रिया करण्याचे महत्त्व, ई-पॉस प्रणालीद्वारे खतांचा साठा आणि खतांच्या वापराचा सध्याचा ट्रेंड, संतुलित खतांचा वापर, बियाण्यांची विक्री आणि साठवणूक करताना घ्यावयाची काळजी, कापूस बियाण्यांसंबंधी तक्रारींवर काय कार्यवाही करावी आणि कार्यपद्धती काय असावी, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कीटकनाशके वापरताना…
बारावीत वैभवी देशमुखला ८५.१३ टक्के गुण बीड (प्रतिनिधी)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. हत्येनंतर तपासासाठी आंदोलन, घरात लहान भाऊ, रडणारी आई, लढणारा काका असे चित्र असतानाही संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने बारावीला चांगला अभ्यास करत यश मिळविले आहे. आज बारावीचा निकाल लागला वैभवीला ८५.१३ टक्के गुण मिळाले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. फरार आरोपींना काही दिवस अटक झाली नाही. दररोज नाट्यमय घडामोडी घडत होत्या. वैभवी देशमुख आपले काका धनंजय देशमुख यांच्यासह खंबीरपणे उभी राहिली. लहान भाऊ आणि आईला सावरत ती आंदोलनातही…
महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेची 21 मे रोजी राज्यव्यापी बंदची हाक मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेने 21 मे रोजी राज्यव्यापी बंदची हाक देत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ई- बाईक टॅक्सीला या संघटनेने विरोध दर्शवला असून याविरोधात राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर 21 मे रोजी आंदोलन करणार आहे. ई-बाईक टॅक्सीमुळे 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. राज्य शासनाने ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी रद्द करावी. यासाठी 21 मे रोजी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती सर्व संलग्न संघटनांद्वारे महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने केली जातील. बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला…
गृहनिर्माण संस्थांचे सदस्यही आता सरकारी वसुलीच्या कचाट्यात मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायद्यात सुधारणा करताना सभासदांकडून तीन तासांचे प्रशिक्षण देण्यासाठी वर्षाला १२० रुपये व संस्थेकडून एक हजार रुपयांचे शिक्षण प्रशिक्षण शुल्क गोळा करण्याचा घाट सहकार विभागाने घातला आहे. जिल्हा हौसिंग फेडरेशन तसेच सत्ताधाऱ्यांशी संबंधित खाजगी प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासाठी एक लाख २० हजार गृहनिर्माण संस्थामधील चार कोटी सभासदांकडून हे पैसे घेतले जाणार आहेत. राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यापक जाळे असून एक लाख, २० हजार गृहनिर्माण संस्थामध्ये चार कोटींच्या आसपास सभासद आहेत. सहकार विभागाच्या या नियमावलीत संस्थेच्या सभासद, व्यवस्थापन समितीच्या प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.…
दिल्लीत हालचाली वाढल्या; हवाई दल, नौदल प्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा नवी दिल्ली (न्युज नेटवर्क) – पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे उलटले असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं जाईल’, असं विधान केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण आहे. एकीकडे सीमेवर दोन्ही बाजूंनी लष्करी सज्जता वाढवली जात असताना दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई दल प्रमुख व नौदल प्रमुखांशी सज्जतेसंदर्भात चर्चा केली. आधी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. अरबी समुद्रातील नौदलाच्या तैनातीवर त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. नौदलाच्या पश्चिमेकडच्या आघाडीवरील युद्धनौका सध्या अरबी समुद्रात उतरवण्यात आल्या आहेत. भारतीय नौदल अरबी समुद्रात…