भारतीय नौदलाकडून जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण नवी दिल्ली (न्यूज नेटवर्क)- भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने अरबी समुद्रात तैनात भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी ही जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागल्याचे म्हटले आहे. भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमणासाठी प्लॅटफॉर्म, प्रणाली आणि दलाची तयारी सिद्ध करण्यासाठी आणि क्षमता दाखवण्यासाठी जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागली. भारतीय नौदल सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी कधीही, कुठेही, कसेही, लढाईसाठी सज्ज आहे.या सरावाचे उद्दिष्ट नौदलाची लढाऊ तयारी आणि भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्याची क्षमता दाखवणे होते. या युद्धनौका अरबी समुद्रात तैनात आहेत. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुरतने अरबी समुद्रात मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा…
Author: Vikas Patil
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला अटक पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुरंगी येथे मनोज सुखदेव पाटील या तरूणाने मध्यरात्री विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठषवली होती. पोलीस स्टेशनला दाखल आधीची तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेची पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली. मनोज पाटील (वय ३३, रा. कुरंगी) यांची पत्नी सरला पाटील हिने ५ मार्च रोजी गावातीलच दीपक आनंदा मोरे याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यामुळे दीपक मोरे वारंवार तक्रार मागे घेण्यासंदर्भात मनोज यास धमकी देत होता. या धमकीमुळे काही दिवसांपासून मनोज पाटील नैराश्यग्रस्त होते. त्यातूनच त्यांनी विष प्राशन केल्याचे तक्रारीत…
प्रेमविवाहाच्या रागातून पित्याचा गोळीबार : मुलगी ठार, जावई जखमी चोपडा (प्रतिनिधी )- प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेली मुलगी व जावयावर गोळीबार केला असून त्याची मुलगी ठार झाली जावई गंभीर जखमी झाल्याने परिसर हादरला आहे. प्रेम विवाहाच्या रागातून आपल्या नणंदेच्या हळदीच्या सोहळ्यासाठी आलेली मुलगी व तिचा पती यांच्यावर सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने गोळीबार केला.यात मुलगी तृप्ती अविनाश वाघ (वय २४ ) हिचा मृत्यू झाला असून तिचा पती अविनाश ईश्वर वाघ ( वय २८ ,दोघे रा करवंद, शिरपूर, ह . मु. कोथरूड पुणे) याला पाठीत व हाताला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शहरातील आंबेडकर नगर…
अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू धरणगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाळधी बायपासजवळ २२ एप्रिलरोजी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात जखमी झालेल्या उपरसिंग करमसिंह बारेला (वय २१, रा. झिरपन, ता. वरला, मध्यप्रदेश, ह.मु. पिंप्री, ) याचा उपचारादरम्यान २५ एप्रिलरोजी सकाळी मृत्यू झाला. पोलीस पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. उपरसिंग मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे. मंगळवारी जळगावकडे दुचाकीने येत असलेले बापुराव पाटील (वय ५२) आणि त्यांची पत्नी संगीता पाटील (वय ४५, दोघे रा. पिंप्राळा, जळगाव) हे देखील जखमी झाले होते. पाळधीहून धरणगावकडे जाणाऱ्या उपरसिंगच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या बापुराव पाटील…
प्रेमभंगानंतर नैराश्यातून तरूणाची आत्महत्या जळगाव (प्रतिनिधी )- शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात प्रेमभंगानंतर नैराश्यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मृत विद्यार्थ्याचे नाव सत्तू कोळी असून, पूर्ण नाव अद्याप समोर आलेले नाही. आत्महत्या करण्यापूर्वी सत्तूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेटस ठेवत भावना व्यक्त केल्या होत्या. सकाळी काही विद्यार्थ्यांच्या लक्षात ही घटना येताच महाविद्यालय प्रशासन व पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. मयताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी…
कंपनीला दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या रिपाइं (आठवले) उपाध्यक्षावर गुन्हा धुळे ( प्रतिनिधी ) – येथील इन्डो अमाईन्स लिमिटेड कंपनीतील उत्पादनाबाबत खोटी तक्रार करण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागून एक लाख रुपये स्वीकारल्याच्या आरोपाखाली रिपाइं (आठवले ) गटाचा उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर याच्याविरुध्द मोहाडी नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील अवधान येथील औद्योगिक वसाहतीतील युनिट जे-५ मध्ये इन्डो अमाईन्स लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीचे प्रकल्पप्रमुख शिरीष गोसावी (४९) यांनी मोहाडी पोलिसात फिर्याद दिली. ९ फेब्रुवारीनंतर इन्डो अमाईन्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात वाल्मिक दामोदरने मोहाडी पोलिसात आणि इतर प्राधिकरणांकडे तक्रारी केल्या. या कंपनीकडून अमोनिया आणि मिथेनॉलचा बेकायदेशीर वापर…
छत्तीसगडमधील कारेगुट्टा जंगलात २० हजार जवानांनी १ हजार नक्षल्यांना घेरले ! बिजापूर (वृत्तसंस्था)- छत्तीसगडमधील कारेगुट्टा जंगलात २० हजार जवानांनी १ हजार नक्षल्यांना घेरले आहे . ही कारवाई जिल्हा राखीव रक्षक दल, बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स, राज्य पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा बटालियन यांच्या संयुक्त पथकांनी राबवली. येथे झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल परिसरात 1 हजार नक्षलवादी असल्याची माहिती समोर येत आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे ही मोहीम आखण्यात आली.मोस्ट वॉन्टेड नक्षल कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा याच्यासह इतर महत्त्वाच्या नक्षल नेत्यांची हालचाल या भागात असल्याची माहिती…
अरबी समुद्रात पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलल्यानंतर पाकिस्तान सावध झाला आहे. दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि संरक्षण मंत्रालयांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे.पाकिस्तानी वायूदलाची लढाऊ विमाने कालपासून सीमारेषेवर गस्त घालत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानी नौदलाने अरबी समुद्रात लष्करी कवायत सुरु केली आहे. पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौकांवरुन क्षेपणास्त्रे डागण्याचा सराव सुरु आहे. अरबी समुद्राच्या उत्तर भागात या लष्करी कवायती सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नौदलाकडून व्यापारी जहाजांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्यापारी जहाजांनी लष्करी कवायती सुरु असलेल्या भागात येऊ नये. या लष्करी कवायती 24 व 25 एप्रिलला सुरु असतील, असे पाकिस्तानकडून…
धर्मादाय रूग्णालयांच्या नियंत्रणासाठी पथक – मुख्यमंत्री मुंबई (प्रतिनिधी) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू ओढवल्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष पथक तयार करण्याचे निर्देश दिले. महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या तसेच महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करावी, अशा सूचना फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा आढावा घेण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले, धर्मादाय रूग्णालयात १० टक्के खाटा निर्धन घटक तर १० टक्के…
दहशतवादी हल्ल्याचा यावल येथे निषेध यावल (प्रतिनिधी)- काश्मीरमधील पहेलगामला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले या भीषण हल्ल्याचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने यावल तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले. २१ एप्रिल रोजी या हल्ल्यात भारतीय तसेच परदेशी पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून यावलमधूनही तीव्र प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने यामध्ये अपयश पत्करले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा. मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. या वेळी शहरप्रमुख…