Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»Naxalites : छत्तीसगडमधील कारेगुट्टा जंगलात २० हजार जवानांनी १ हजार नक्षल्यांना घेरले !
    राज्य

    Naxalites : छत्तीसगडमधील कारेगुट्टा जंगलात २० हजार जवानांनी १ हजार नक्षल्यांना घेरले !

    Vikas PatilBy Vikas PatilApril 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्तीसगडमधील कारेगुट्टा जंगलात २० हजार जवानांनी १ हजार नक्षल्यांना घेरले !

    बिजापूर (वृत्तसंस्था)-

    छत्तीसगडमधील कारेगुट्टा जंगलात २० हजार जवानांनी १ हजार नक्षल्यांना घेरले आहे . ही कारवाई जिल्हा राखीव रक्षक दल, बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स, राज्य पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा बटालियन यांच्या संयुक्त पथकांनी राबवली. येथे झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

    छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल परिसरात 1 हजार नक्षलवादी असल्याची माहिती समोर येत आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे ही मोहीम आखण्यात आली.मोस्ट वॉन्टेड नक्षल कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा याच्यासह इतर महत्त्वाच्या नक्षल नेत्यांची हालचाल या भागात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर व्यापक पातळीवर कारवाई सुरु करण्यात आली. कालपासून ही चकमक नडपल्लीच्या पहाडी परिसरात सुरू असून ड्रोनच्या माध्यमातून चकमकीवर सुरक्षा दल लक्ष ठेवून आहे.

    अजून काही जखमी नक्षलवाद्यांची उपस्थिती नाकारता येत नाही. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, तीन राज्यांतील 20 हजारांहून अधिक सुरक्षा दलाचे जवान या कारवाईत सहभागी आहेत.

    उसूर पोलीस ठाणे क्षेत्रातील गलगम-नडपल्ली परिसरातील डोंगराळ भागात ही चकमक सुरू या भागात नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता गृहीत धरून सुरक्षा दलांनी मोहीम तीव्र केली असून उच्च दक्षता पाळली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.