Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»missile firing exercise : अरबी समुद्रात पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव
    मुंबई

    missile firing exercise : अरबी समुद्रात पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव

    Vikas PatilBy Vikas PatilApril 24, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अरबी समुद्रात पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव

    नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलल्यानंतर पाकिस्तान सावध झाला आहे. दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि संरक्षण मंत्रालयांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे.पाकिस्तानी वायूदलाची लढाऊ विमाने कालपासून सीमारेषेवर गस्त घालत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानी नौदलाने अरबी समुद्रात लष्करी कवायत सुरु केली आहे. पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौकांवरुन क्षेपणास्त्रे डागण्याचा सराव सुरु आहे.

    अरबी समुद्राच्या उत्तर भागात या लष्करी कवायती सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नौदलाकडून व्यापारी जहाजांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्यापारी जहाजांनी लष्करी कवायती सुरु असलेल्या भागात येऊ नये. या लष्करी कवायती 24 व 25 एप्रिलला सुरु असतील, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक केला जाऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. दिल्लीत बुधवारी संरक्षण मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर भारतीय नौदल आणि वायूदल कमालीचे सक्रिय झाले आहे. भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानची टेहळणी विमाने ही भारतीय सीमारेषेलगत गस्त घालताना दिसत आहेत.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच मोदी दौरा अर्धवट सोडून भारतात परतले पंतप्रधान मोदी यांनी सौदीला जाताना पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला होता. परंतु, भारतात परत येताना मोदींनी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला नाही. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Mumbai : महापालिका निवडणूक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण; गट एकत्र येण्याची शक्यता

    January 17, 2026

    Mumbai : ४६ पैकी ४६”चा पराक्रम आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांची शाबासकी,

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.