जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे दै. ‘साईमत’चे उपसंपादक तथा जामनेर येथील रहिवासी शरद प्रभाकर भालेराव यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ‘समाज चिंतामणी’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युद्धजन्य परिस्थितीमुळे आयोजकांनी कार्यक्रमाच्या नियोजनात बदल केला होता. त्यामुळे आयोजकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी, २० मे २०२५ रोजी आयोजित एका छोट्याखानी कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ‘सलाम’ काव्यसंग्रह पुस्तक, पेन, शाल, श्रीफळ, बुके असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी डाएट कॉलेजचे माजी प्राचार्य तथा माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी.कोळी, सिंधूताई सपकाळ यांचे मानसपुत्र डी.बी.महाजन, कवी गोविंद…
Author: Sharad Bhalerao
गॅस गळतीचा बळी : उपचारावेळी महिलेचा अखेर मृत्यू साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या महिन्यांपूर्वी स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे गंभीररित्या भाजलेल्या जळगावातील रामेश्वर कॉलनीतील ५० वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी, २२ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांची महिन्याभरापासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे. उषा गुलाब मोरे असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, उषाबाई मोरे ह्या आपला मुलगा सोनू आणि सून यांच्यासोबत रामेश्वर कॉलनीतील घरात वास्तव्याला होत्या. सुमारे एक महिन्यांपूर्वी त्या नेहमीप्रमाणे गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक…
पंचायत समितीत प्रशिक्षणाद्वारे दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आगामी पावसाळ्याच्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार, २२ मे रोजी जळगाव पंचायत समिती येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. प्रशिक्षणाद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. शिबिरावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ मिनल करनवाल यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. पावसाळ्यात उद्भवणारे पूर, वादळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचे प्रसंग टाळण्यासाठी तसेच तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात स्वयंसेवकांची एक विशेष टीम (आपत्ती मित्र) उभारण्यात येत आहे. अशा टीमच्या माध्यमातून जिल्ह्याभरात आपत्तीच्या काळात…
ऑटो रिक्षा चालक-मालकांचे आरटीओ कार्यालयासमोर धरणे साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पंतप्रधान ई-बस सेवेच्या विरोधात ऑटो रिक्षा चालकांनी तीव्र मागणी केली आहे. त्या मागणीच्या मागे मुख्य कारण म्हणजे ऑटो रिक्षा चालकांच्या रोजगारावर नवीन सेवेमुळे येणारा धोका. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांची संख्या लक्षात घेता अशा सेवेमुळे प्रादेशिक स्तरावरील रोजगाराच्या संधी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पीएम ई-बस सेवा सुरू करण्याच्या निर्णयामुळे ऑटो रिक्षा चालकांच्या रोजगाराच्या संधी कमी होण्याची शक्यता आहे. या सेवेमुळे ऑटो रिक्षा चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, असे चालकांना वाटत आहे. त्यामुळे शासनाने ऑटो रिक्षा चालकांच्या मागण्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची रोजगाराची सुरक्षा सुनिश्चित होईल. ‘ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना…
जैन इरिगेशनचे जागतिक केळी तज्ज्ञ म्हणून ओळख साईमत/जळगाव/प्रतिनिधी जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ तथा उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर केंद्र सरकारने निवड केली आहे. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा केळीच्या संशोधनाला दिशा देण्यासाठी होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी अभिनंदन केले आहे. गेल्या तीस वर्षापासून डॉ. के. बी. पाटील हे केळी पिकाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. केळी उत्पादन तंत्रज्ञानावर अनेक प्रकारचे संशोधन करून जैन टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळी पिकात क्रांती केली आहे. केळीची काढणी पूर्व व काढणी पश्चात…
सर्व बिले मंजुरीनंतर वेतन खात्यावर जमा, आंदोलन घेतले मागे साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे नियमित पगार बिल प्रलंबित होते. त्यामुळे जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, कोषागार कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाबाबत प्रचंड खेद व्यक्त करण्यात आला. कोषागार अधिकाऱ्यांनी तातडीने त्याचवेळी सर्व बिले मंजूर केली. त्यानंतर वेतन खात्यावर जमा झाल्याचे मॅसेज आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. हे आंदोलन एस.डी.भिरुड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सुरवातीला शालार्थ आय डी घोटाळा चौकशीच्या नावाखाली काही दिवस वेतन पथक ट्रेझरीला बिल सादर करत नव्हते. संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर…
संमेलनात कवी, कवयित्रींनी कविता सादर करून आणली रंगत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पुणे येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात नुकत्याच दोन दिवसीय पार पडलेल्या आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनात जळगावातील कवींनी सहभाग नोंदविला होता. तसेच राज्यभरातूनही अनेक कवी, कवयित्री सहभागी झाले होते. संमेलनात जळगावमधून नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या जळगाव जिल्हाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री पुष्पलता एन.कोळी, ज्येष्ठ कवी निवृत्तीनाथ कोळी, शाहनूर तडवी, जिजाबराव सोनवणे, यावलच्या कवयित्री स्वाती सूर्यवंशी, योगीता कोळी, राजू कोळी, पितांबर कोळी आदी सहभागी झाले होते. आठव्या नक्षत्र महाकाव्य संमेलनाचे म.भा.चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर ग्रामगीताचार्य राज्य समन्वयक बंडोपंत बोढेकर, डाॅ.शांताराम कारंडे, डाॅ.अलका नाईक, संयोजक कवी प्रा.राजेंद्र…
सहाय्यक कार्यकारी अभियंता वर्ग १ पदी निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : एमपीएससीमार्फत सहाय्यक कार्यकारी अभियंता (एईई) वर्ग १ पदी राज्यातून मुलींमधून आठवा तर जनरल मेरिट लिस्ट (मुला-मुलींमधून) ३२ व्या क्रमांकाने जळगाव येथील कल्याणी गणेश पाटील यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या त्या अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी चार स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविलेले आहे. शालेय शिक्षणापासूनच त्यांची यशाची कमान वाढती राहिली आहे. जळगावमधील शासकीय तंत्रनिकेतन स्थापत्यमध्ये त्यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर पुणे येथील सीओईपी कॉलेजमधून बीटेक सिव्हिलची पदवी पूर्ण केली आहे. गुरुजनांसह आई-वडील, मार्गदर्शकांना दिले यशाचे श्रेय…
राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक : डॉ. श्रीपाल सबनीस साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पुरस्कार प्रेरणा देतात आणि त्यातून राष्ट्र निर्मिती होते. अशा व्यापक दृष्टीने प्रेरित होऊन जळगाव येथील ‘समाज चिंतामणी प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात शिक्षण, साहित्य, समाजसेवा, प्रशासन, पत्रकारिता आदी क्षेत्रात नि:स्वार्थपणे कार्य करुन देशसेवा करणाऱ्या कर्मवीरांना मान्यवरांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. युद्धजन्य परिस्थितीमुळे कार्यक्रमाच्या नियोजनात बदल केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस होते. त्यांनी व्हीडीओद्वारे केलेल्या १५ मिनिटांच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महापुरुषांच्या विचारांतून एकात्मक भारतीय संस्कृती व एकात्मक…
‘प्रशासन आपल्या दारी’, जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या संबंधित कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयांमध्ये नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्ष साचलेल्या तक्रारी आणि त्यांना वारंवार माराव्या लागणाऱ्या फेऱ्या आता थांबणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोनवेळा तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण केले जाईल. तसेच नागरिकांना ‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रमाचा प्रत्यय येईल. उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. विशेष तक्रार निवारण दिनामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित राहतील. त्यामुळे…