जिल्हापेठ पोलिसात दोन अनोळखींवर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पोलीस असल्याची बतावणी करत दुचाकीस्वारांनी संजय भगीरथ सोमाणी (वय ५९, रा. सोमाणी गल्ली, पिंप्राळा) यांच्याजवळील सोन्याची चेन व अंगठी लांबविली. ही घटना २७ मे रोजी बजरंग बोगद्याजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली होती. याप्रकरणी सोमाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात दोन अनोळखींवर गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. संजय सोमाणी हे दुचाकीने घरी जात असताना पोलिसांचा गणवेश घातलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना थांबविले. त्यानंतर सोमाणी यांनी त्यांना वाहन परवाना दाखविला. त्यातील एकाने पंजाब व उत्तर प्रदेश येथून काही लोक आले आहेत, तुमच्या हातातील अंगठी व सोन्याची चेन काढून ठेवा, असे सांगत दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. चेन…
Author: Sharad Bhalerao
फैजपुरातील बैठकीत दिंडी समितीचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची माहिती साईमत/फैजपूर/प्रतिनिधी: यावल आणि रावेर तालुक्यातील वारकरी परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेल्या वै. डिगंबर महाराज चिनावळकर यांच्या आषाढी पायी दिंडीचे येत्या ६ जून रोजी खानापूर येथून प्रस्थान होणार असल्याची माहिती दिंडी समितीचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली. यासंदर्भात फैजपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी नरेंद्र नारखेडे होते. यावेळी दिंडी परंपरेचे अधिपती दुर्गादास महाराज नेहते होते. बैठकीत दिंडीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष घनश्याम भंगाळे, सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोले, विश्वस्त जयराम पाटील, शरद महाजन, धनंजय चौधरी, विजय महाजन, रमेश महाजन, टेनूदास फेगडे, भास्कर बांडे, अतुल तळेले, ललिता महाजन, आशाबाई…
मोर्चेकऱ्यांचे ‘कचरा फेका, मडके फोडा’आंदोलन साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : आगामी काही दिवसात पावसाळ्यामुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. अशातच सर्व समस्यांबाबत न.प.प्रशासनाला गेल्या २० दिवसांपूर्वी (६ मे रोजी) निवेदन देऊनही प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडालेली नाही. त्यामुळे गुरुवारी, २९ मे रोजी हुतात्मा स्मारक ते नगर परिषद कार्यालयापर्यंत गाढव मोर्चा काढून न.प.येथे ‘कचरा फेका, मडके फोडा’ आंदोलन करण्यात आले. मोर्चात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यासह नगरवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. न.प. प्रशासनाच्या कामचुकार, बेलगाम, भ्रष्ट कारभारामुळे मलकापूर शहरातील नाले अनेक दिवसांपासून स्वच्छ होत नाहीत. दररोज रस्त्यांची स्वच्छता होत नाही. नित्य कचरा संकलन होत नाही. पूर्णा मायला मुबलक पाणी आहे. असे…
तापी तीर ते भीमा तीर आषाढी वारी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३१६ वे वर्ष साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा हा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने हजारो वारकरी, भक्तांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. यंदा आषाढी वारीचे ६ जून रोजी प्रस्थान होणार आहे. आदिशक्ती संत मुक्ताई मूळ मंदिर कोथळी ज्या ठिकाणी संत मुक्ताई ७२८ वर्षांपूर्वी अंतर्धान पावल्या, तेथून दरवर्षी हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी संत मुक्ताईच्या चांदीच्या पादुका पंढरपूर येथे जात असतात. यंदाचे आषाढी वारीचे ३१६ वे वर्ष आहे. कोथळी येथील संत मुक्ताईच्या मूळ मंदिरातून शुक्रवारी, ६ जून रोजी दुपारी ३ वाजता…
अमळनेरला विविध विकास कामांच्या पायाभरणीप्रसंगी आवाहन साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्पन्नातून लोकोपयोगी कामे उभी करावी, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. ते कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभप्रसंगी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ.अनिल पाटील उपस्थित होते. याप्रसंगी बाजारसमितीच्या आवारात ‘माझा शेतकरी माझा अभिमान’, शेतकरी प्रेरणास्थळाचे, भव्य गोडाऊन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. शासनाने शेतकऱ्यांच्या विविध थकबाकी लवकर अदा केल्यास शेतकरी आनंदी होईल, अमळनेर बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजनांना प्राधान्याने पाठबळ द्यावे, असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले. याप्रसंगी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संजय पवार,…
चंद्रकांत बढे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल, एकास अटक साईमत/वरणगाव/प्रतिनिधी वरणगाव ते बोदवड मार्गावरील श्री नागेश्वर महादेव मंदिर संस्थेची जागा अध्यक्ष चंद्रकांत बढे यांनी एका फायर इन्स्टिट्यूट संस्थेला भाडेतत्त्वावर दिली आहे. मात्र, जागेचा भाडे तत्त्वाचा वाद सुरू असतांनाच भाडेकरूने बळजबरीने कंपाऊड करण्यास सुरुवात केली होती. याबाबत त्यांनी मज्जाव केल्यावर वाद विकोपाला जावून भाडेकरूचे पती दीपक वानखेडे आणि त्यांचा सहकारी जितेंद्र माळी यांनी बढे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली होती. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच एकास अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सविस्तर असे की, वरणगाव ते बोदवड मार्गावरील पुरातन श्री नागेश्वर महादेव मंदिर संस्था…
सभासद, ग्राहक मेळावा उत्साहात, इमारतीचे लोकार्पण साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : अमळनेर अर्बन बँकेने १०० वर्ष काम केले आहे. अशा काम करणाऱ्या संस्थांमुळे राज्यात स्व.यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी केले. येथील छ.शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अमळनेर को.ऑप.अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य सभासद ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी अर्बन बँकेच्या अद्ययावत सोयींनी युक्त नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील होते. समारंभात बँकेचे ज्येष्ठ सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला. अमळनेर अर्बन बँक येथे कोनशिलाचे अनावरण…
शहरांच्या काही? लॉजेसमध्ये चालतोय बेकायदेशीर ‘गोरखधंदा’ साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : शहरातील काही लॉजेसमध्ये वाममार्गी गोरखधंद्यांना ऊत आला आहे. अशा प्रकारांकडे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्य करणारे आणि अशा प्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या हॉटेल, लॉजच्या मालकांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. पाचोरा शहरात गेल्या काही वर्षांपासून वाममार्गी आंबट शौकीन लफडेबाज जोडप्यांना बेकायदेशीर आणि आधारकार्ड वगैरेंची तपासणी न करता काही तासांसाठी राजरोसपणे खोल्या उपलब्ध करून दिल्या जात आहे. असाच काहीसा प्रकार २८ मे रोजी रोजी पाचोरा शहरातील हायवेवरील न्यू वाघ साई पॅलेस हॉटेल अॅण्ड लॉजिंग (डब्ल्यू हॉटेल) येथे घडला. या प्रकाराची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून एक युवक…
तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार : आ.मंगेश चव्हाण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच मंुबईत बैठक पार पडली. बैठकीत जळगाव जिल्ह्यातील प्रमुख एमआयडीसीपैकी एक असणाऱ्या चाळीसगाव तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार तसेच ना.गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात चाळीसगाव एमआयडीसी उत्तर महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येऊन तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आ.मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. चाळीसगाव…
पाळधीला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन साईमत/पाळधी, ता.धरणगाव/वार्ताहर : ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा, संयम आणि शांतता अंगीकारा, विघ्नसंतोषी लोकांकडे दुर्लक्ष करा आणि यशस्वी व्हा, असा त्रिसूत्री मंत्र पाळधी येथे आयोजित कीर्तनात खान्देश भूषण ह.भ.प. रविकिरण महाराज, दोंडाईचेकर यांनी दिला. त्यांनी तरुणांना उदात्त जीवनाचे मार्गदर्शन करत आदर्श विचारांची पेरणी केली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पाळधीतील अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रविकिरण महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. संकीर्तन सप्ताहाचे यंदा सलग तिसरे वर्ष आहे. कीर्तनात महाराज म्हणाले की, आवडे देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा…