Author: Sharad Bhalerao

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची झाडाझडती घेण्यात आली. कारण कारागृहात बंदिस्त असलेल्या आरोपींकडून काही आक्षेपार्ह वस्तू सापडतात का? यासाठी ही झाडाझडती मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने विविध शाखांच्या मदतीने करण्यात आली. मात्र, तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नसल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली. झाडाझडती मोहिमेत डॉग स्कॉड, क्यूआरटी, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), जिल्हा पेठ पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी सहभागी झाले होते. ही संपूर्ण कारवाई नुकतेच एलसीबीचे पदभार स्वीकारलेले संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारागृहाची बारकाईने केली तपासणी जळगावमधील मध्यवर्ती कारागृह जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहे.सध्या तेथे क्षमतेपेक्षा…

Read More

वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट मिळवा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वसुंधरेच्या संवर्धनासाठी ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडावा, असे महावितरणने आवाहन केले आहे. दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई-मेलद्वारे वीज बिल स्वीकारण्याच्या ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तात्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट महावितरणकडून दिली जात आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय पहिल्याच वीज बिलात पुढील बारा महिन्यासाठी तात्काळ १२० रूपये एकरकमी सवलत देण्यात येते. महावितरणच्या ३ कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत ६ लाख…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाच्या चेअरमनांकडे मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची नुकतीच भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्याची मागणी केली आहे. बैठकीत रावेर आणि वरणगाव स्थानकांवर स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांचे थांबे देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. श्रीमती खडसे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली. त्यात नवजीवन एक्स्प्रेस (गाडी क्र. १२६५६)–बोदवड थांबा, दानापूर-पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. १२१५०)–रावेर थांबा (पुणे मार्ग), महानगरी एक्सप्रेस (गाडी क्र. २२१७७)–रावेर थांबा ह्या गाड्यांचा समावेश आहे. रावेर येथे गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय…

Read More

मुस्लिम बांधवांनी, समाजाने कायद्याचे पालन करण्याचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील जिल्हा अधीक्षक कार्यालयात जळगाव शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांची शांतता कमिटीची बैठक बकरी ईद चार समाज निमित्त आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी एसडीपीओ संदीप गावित होते. बैठकीत त्यांनी बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी कोणत्याही प्रकारे गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. बैठकीला मुफ्ती हारून नदवी, अब्दुल करीम सालार, एजाज मलिक नगरसेवक रियाज बागवान, विश्वनाथ जोशी, सलीम इनामदार, सय्यद अयाज़ अली नियाज अली, फारुक कादरी, वाहेद खान, सय्यद चांद, दीपक जोशी, युसुफ पिंजारी, असलम कुरेशी, रफिक कुरेशी उपस्थित होते. बंदी असलेल्या जनावरांची कुर्बानी करू नये यावेळी उपस्थित…

Read More

विशेष सराव शिबिराप्रसंगी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थी खेळाडूंनी शिस्त व सरावातील सातत्य निरंतर ठेवल्यास त्यांना विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त होऊन त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल होऊ शकतो, असे प्रतिपादन प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे मैदानी क्रीडा प्रकारातील विद्यार्थी व विद्यार्थिंनी खेळाडूंसाठी बुधवारपासुन १२ जूनपर्यंत १० दिवस कालावधीचे विशेष सराव शिबीर आयोजित केले आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड.अमोल पाटील, प्रा.म.सु.पगारे, अधिसभा सदस्य स्वप्नाली काळे-महाजन, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील उपस्थित होते. ते पुढे म्हणले की, विद्यापीठाने टॅलेंट सर्च सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा सराव…

Read More

खामखेडा येथील धनगर समाज युवक मंचतर्फे व्याख्यानात प्रतिपादन साईमत/शिरपूर/प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी राज्य कारभार करताना संयमी वृत्ती आणि बुद्धी चातुर्याने प्रशासन, संघटन आणि व्यवस्थापनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अत्यंत कौशल्यपूर्ण नियोजन केले. त्यामुळे शस्त्र अन्‌ शास्त्राविषयी समर्पणाचा भाव म्हणजे अहिल्याबाई होळकर असल्याचे प्रतिपादन यावल येथील सरस्वती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांनी केले. याप्रसंगी त्यांनी आपल्या व्याख्यानात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास मांडला. तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शिरपूर तालुक्यातील खामखेडा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या साजरी करण्यात आली. खामखेडा येथील धनगर समाज युवक मंचतर्फे त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिरपूर…

Read More

बसस्थानक ते नवी पेठ दरम्यान घडली घटना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील नवीन बस स्थानक येथून नवीपेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानात येण्यासाठी ६५ वर्षीय महिला रिक्षात बसली होती. रिक्षातील एका अनोळखी महिलेने संधी साधून महिलेच्या पर्समधून २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोतवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सुशिला नगर भागात राहणाऱ्या लिलाबाई ताराचंदजी टाटीया (वय ६५) ह्या जळके येथे माहेरी आल्या होत्या. ३ जून रोजी त्या सकाळी १० वाजता बसने जळगाव स्थानकावर आल्या. गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची मंगल पोत तुटलेली असल्याने ती जोडण्यासाठी त्या त्यांची बहीण प्रेमलता चोपडा आणि वहिनी संगिता…

Read More

रुग्णालयात नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली गर्दी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरात जुन्या महामार्गावरील निमखेडी शिवारात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा सख्ख्या भावांचा बुधवारी, ४ जून रोजी पहाटेच्या सुमारास जागीच मृत्यू झाला. अपघातात ज्ञानेश्वर दगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे असे मयत झालेल्या भावांची नावे आहेत. दरम्यान, एकाच अपघातात दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच शहरात हळहळ व्यक्त होत असून शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. शहरातील जुन्या महामार्गावरील कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने ज्ञानेश्वर शिवदे आणि प्रमोद शिवदे यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर शिवदे…

Read More

पोलिसांनी शेतकऱ्याला वेळीच रोखले, अनर्थ टळला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : लघु सिंचन विभागाच्या पाझर तलावातील पाण्याने सलग ४० वर्षांपासून शेती व पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालो आहे. तरीही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करत बोदवड येथील शेतकरी शांताराम रामकृष्ण कोळी आणि मनकरणाबाई रामकृष्ण कोळी यांनी बुधवारी, ४ जून रोजी सकाळी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. त्यांना जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील यांच्या दालनात नेले. यावेळी त्यांनी त्यांची बाजू ऐकून घेत त्यांच्या शेतीकडे रवाना झाले. शांताराम कोळी यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने सकाळपासूनच पोलिसांनी जिल्हा परिषद येथे बंदोबस्त लावला होता. कोळी हे त्यांच्या…

Read More

डॉ. सुरेश सावंत, डॉ.अनंता सूर, डॉ .प्रकाश सपकाळे, डॉ. नरेंद्र खैरनार आहेत यंदाचे पुरस्कारांचे मानकरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राज्यस्तरीय आणि खान्देशस्तरीय वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. अशा वाडःमय पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवारी, ७,जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित केला आहे. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी असतील. पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. सोहळ्याला विनोद शिरसाठ (संपादन,…

Read More