जिल्हा प्रशासनास आदेश : दिवाळीत निवडणूक होण्याची शक्यता साईमत/धुळे/प्रतिनिधी : राज्यात मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषद गट आणि गण निश्चितीसाठी ग्रामविकास विभागाचा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. आदेशानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि ११२ गण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. जिल्हा परिषद सदस्यांची १६ जानेवारी २०२५ रोजी मुदत संपली. तेव्हापासून जिल्हा परिषद आणि चारही पंचायत समित्यांवर प्रशासक कार्यरत आहेत. निवडणुका कधी होतील, याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने दिवाळीत निवडणुका होण्याची शक्यता…
Author: Sharad Bhalerao
उद्योग आणण्याची जबाबदारीही स्थानिक उद्योजकांच्या गळ्यात बांधल्याने व्यक्त होतेय आश्चर्य साईमत/नाशिक/प्रतिनिधी : नाशिकच्या उद्योजकांना अनेक वर्षांपासून आयटी पार्कचे केवळ गाजर दाखवले जात आहे. मात्र, ठोस काहीच घडत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या आयटी धोरणात नाशिकला डावलण्यात आले असताना, उद्योगमंत्र्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आयटी पार्कसाठी २५ एकर जागेची घोषणा करत तेथे उद्योग आणण्याची जबाबदारीही स्थानिक उद्योजकांच्या गळ्यात बांधल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई-पुण्यानंतर नाशिकमध्ये आयटी उद्योगांना मोठा वाव आहे. या क्षेत्रातील मोठे उद्योग आल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल, असे स्थानिक उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे निमा, आयमासारख्या संघटनांकडून नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्याची मागणी केली जात आहे. औद्योगिक महामंडळाने अंबड येथे सव्वा दोन कोटी…
कल्पतरू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रशिक्षणाचे आयोजन साईमत/साक्री/प्रतिनिधी : कल्पतरू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित साक्री महिला मंडळातर्फे नुकतेच महिलांना साबण बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक सौंदर्य साबण बनवून लघु उद्योगाला चालना कशी देण्यात येईल, हे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ललिता भावसार यांनी केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साक्री नगर पंचायतीच्या नगरसेविका संगीता भावसार, तारकेश्वरी निकम, शीतल सोनवणे, सुमन नांद्रे उपस्थित होते. यासाठी कृतिका भावसार, रूपाली हरळे, वर्षा बच्छाव, काजल कश्यप, हर्षदा मराठे तसेच साक्री येथील शिवप्रतिष्ठानच्या महिलांनी सहकार्य केले. महिलांसाठी प्रशिक्षण ठरले मोलाचे कार्यक्रमाला कल्पतरू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सियामोहन शुक्ला, उपाध्यक्ष पूनम भावसार, सचिव हसमुख पांचाल, खजिनदार नगमा…
विजयस्तंभ परिसरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला तीव्र शोक साईमत/शिरपूर/प्रतिनिधी : गुजरातमधील अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात होऊन दोनशेंच्यावर प्रवाशांसह अन्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा सर्व निष्पाप नागरिकांना शिरपूर शहरातील विजयस्तंभ परिसरातील व्यापाऱ्यांनी तीव्र शोक व्यक्त करुन मृतांना रविवारी, १५ जून रोजी सायंकाळी आदरांजली वाहिली. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी उपस्थित नागरिकांसह व्यापाऱ्यांच्यावतीने सर्व मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. अपघातात बळी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांच्या कठीणप्रसंगी आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. मेणबत्त्या प्रज्ज्वलित करुन पाळले मौन याप्रसंगी सर्व बळी गेलेल्यांच्या प्रती मेणबत्त्या प्रज्ज्वलित करुन मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भाजपा भटके…
शाळांमध्ये लोकप्रतिनिधींसह अधिकारी करणार नवागतांचे स्वागत साईमत/धुळे/प्रतिनिधी : राज्यातील शाळांमध्ये सोमवारी, १६ जूनपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त शासनाच्या शिक्षण विभागामार्फत ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम उत्साहात, प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरावरून १०० शाळांमध्ये तर प्रत्येक तालुक्यात १०० याप्रमाणे ५०० शाळांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सवाची तयारी केली आहे. शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सवासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जल्लोषात तयारी केली आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या शालेय शिक्षण…
सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील खळबळजनक घटना साईमत/नाशिक/प्रतिनिधी : सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथे एका पत्नीने आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. इतकेच नव्हे तर तिने त्याचे तुकडे करून ते घरातच पुरल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. इंदोरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच, ही घटना समोर आली आहे. दरम्यान, यशवंत मोहन ठाकरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील यशवंत ठाकरे हे रहिवासी होते. त्यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या केली. आपला मुलगा दोन महिन्यांपासून गुजरातमध्ये मजुरीसाठी गेला. तो अजूनही परत न आल्याने यशवंतच्या आई-वडिलांनी सुनेकडे विचारणा केली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, सून…
जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील दाणाबाजारात पार्सल देण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. मारहाणीत एका तरुणाला लोखंडी पाईपनेही मारहाण केली होती. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील सुप्रिम कॉलनी येथील रहिवासी मुस्तकीम शेख अलीम शेख (वय २०) हा भाटीया मार्केटमधील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. त्याचे दुकान मालक पवन दांडगे यांनी त्याला दाणाबाजारातील हिरा धनगर यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये एक पार्सल देण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार, मुस्तकीम हा त्याचा सहकारी प्रफुल्ल कोळी (रा. मोहाडी) याला सोबत घेऊन ट्रान्सपोर्ट ऑफिसला गेला होता. यावेळी ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कुणाल…
नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे यांचे प्रतिपादन साईमत/नवापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिलीचा अभ्यासक्रम बदलला आहे.अभ्याक्रमातील बदल, त्यातील अध्ययन आणि अध्यापन पद्धती आणि इतर विषयांची माहिती देण्यासाठी नवापूर तालुक्यातील ३०० शाळेतील पहिलीच्या वर्गावरील शिक्षकांचे ९ ते १४ जून या कालावधीत प्रशिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी, मनोरंजनात्मक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करून शैक्षणिक वातावरणाने शैक्षणिक वर्षाची सुरुवात करावी, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे यांनी व्यक्त केली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची (एनईपी) अंमलबजावणी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात यंदापासून होत आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल. हे शिक्षण धोरण चार…
जि.प.च्या गटांसह गणांच्या रचनेचीही तयारी, १६ जुलैला अधिसूचना तर १८ ऑगस्टला अंतिम रचना जाहीर होणार साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी : येथील नगरपालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचेही पडघम वाजू लागले आहेत. १४ जुलै प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम प्रभाग रचना ही १८ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. सध्या असलेल्या ५६ गट आणि ११२ गणांच्या संख्येत कुठलाही बदल होणार नसल्याचे राज्य शासनाच्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे पूर्वीच्याच पद्धतीने गट व गणांच्या निवडणुका होतील हे स्पष्ट आहे. दरम्यान, नगर पालिका आणि जिल्हा परिषदांचा निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरू झाल्याने आधी पालिका की जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, याबाबत उत्सुकता लागून राहणार…
उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवत व्यक्त केल्या सहवेदना साईमत/धुळे/प्रतिनिधी : गुजरातमधील अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाचा गुरुवारी, १२ जून रोजी अपघात होऊन दोनशेंच्यावर प्रवाशांसह अन्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. अशा सर्व निष्पाप नागरिकांना शनिवारी, १४ जून रोजी सायंकाळी शहरातील गुरू-शिष्य स्मारकाजवळ आ.अनुप अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनतर्फे आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्ज्वलित करत सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश अग्रवाल, एबी फाउंडेशनच्या संचालिका अल्पा अग्रवाल, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी भीमसिंह राजपूत, विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, जि.प.च्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, महिला आघाडीच्या वैशाली शिरसाट, माजी नगरसेविका आरती…