२५३ पोस्टर्स, १९ मॉडेलच्या माध्यमातून सादरीकरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित विद्यापीठ प्रशाळांसाठी पहिल्या टप्यातील आविष्कार २०२५ स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत ४१८ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच २५३ पोस्टर्स आणि १९ मॉडेलच्या माध्यमातून सादरीकरण केले. विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात आविष्कार २०२५ स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा, अस्टेमो इंडिया प्रा. लि. कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर योगेश हेंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. जयदिप साळी, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, डॉ. कांचन…
Author: Sharad Bhalerao
साहित्य क्षेत्रात ‘बहिणाईची लेक’ ओळख असणाऱ्याचा पहिलाच गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लेवा गणबोली दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे काव्य संमेलनाचे आयोजन केले होते. महामंडळाने दरवर्षी संमेलन घेतांना साहित्य, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे भरीव योगदान देणाऱ्या एका महिलेला कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्काराने सन्मानित करायचे, असे ठरवले आहे. त्यानुसार यंदाचा प्रथम पुरस्कार खान्देश तसेच महाराष्ट्रात आपल्या साहित्यिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या साहित्य क्षेत्रात ‘बहिणाईची लेक’ अशी ओळख असणाऱ्या प्रा.संध्या महाजन यांना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. माजी महापौर सीमा (राजूमामा) भोळे यांच्या विशेष सौजन्याने काव्यसंमेलनाचे आयोजन केले होते. परिसरातील उपस्थित सर्व साहित्यिक मंडळींनी…
बहिणाबाईंच्या जीवन कार्यावर उपप्राचार्य डॉ.साळवे यांचे व्याख्यान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन अर्थात विश्व लेवा गणबोली दिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीला बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.पी.एन.तायडे, उपप्राचार्य सुनिता पाटील होते. यावेळी मराठी विभागाचे प्रमुख तथा महाविद्यालयाचे कला आणि वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांनी बहिणाबाईंच्या जीवन आणि कार्यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी बहिणाबाईंच्या गाण्यांनी मराठी मनावर कसे गारुड केले आहे, त्याचे रसाळ भाषेत वर्णन केले. बहिणाबाईंची गाणी ही जीवन, व्यवहार आणि तत्त्वज्ञान यांचे सांगड घालणारी…
विद्यार्थ्यांनी नृत्यांचे सादरीकरण करून जिंकली उपस्थितांची मने साईमत/जळगाव/प्रतिनिधी : प्रबोधन संस्था संचालित मातोश्री प्राथमिक विद्यालयात माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निसर्गकन्या तथा ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सुरुवातीला बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन शारदा मोहिते यांच्या हस्ते झाले. त्यानंतर इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या ओव्या, कविता, भाषण तसेच त्यांच्या कवितांवर आधारित नृत्यांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमोद झलवार यांनी विद्यार्थ्यांसाठी बहिणाबाईंच्या साहित्यावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. कार्यक्रमात प्रियांका सोळंके, हेतल, सेजल, उन्नती, पूजा, तन्वी, प्रांजल सोनवणे, स्वरा राठोड, तेजस कापडे, ध्रुव पाटील, समर शिरसाळे, लाजर बाविस्कर, सना तडवी, आरती पवार,…
जळगाव परिमंडळात ‘ दिव्यांग दिन’ साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात ३ डिसेंबर रोजी ‘जागतिक दिव्यांग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महावितरणमधील दिव्यांग अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्या हस्ते अनुकूलित वाहनांचे वितरण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने नंदुरबार मंडलातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. बुधवारी झालेल्या विशेष कार्यक्रमास जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, अधीक्षक अभियंता, पायाभूत आराखडा मनोज विश्वासे, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरुंगे, कार्यकारी अभियंता मानसी सुखटनकर, चेतन नंदनवार कार्यकारी अभियंता (प्रशासन) जळगाव मंडल, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) गणेश लिधूरे, अमित सोनवणे व.व्यवस्थापक (विवले), तन्वी मोरे व्यवस्थापक (मासं) तसेच दिव्यांग प्रहार संघटनेचे अध्यक्ष…
रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा परिसरातील सुतारवाडा भागात बंद घराला लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह चोरट्यांनी ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी बंद घरे सोडून जाताना अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पिंप्राळा येथील रहिवासी प्रमीलाबाई साहेबराव चौधरी (वय ६५) या त्यांच्या मुलीकडे सोनगीर येथे गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६…
१५ डिसेंबरपर्यंत शेतकरी नोंदणी करा, जिल्हा प्रशासनाचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदीकरिता शेतकरी नोंदणीच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. पूर्वी ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, आता असलेली नोंदणी BeAM पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असून नोंदणी संथगतीने होत असल्याने शासनाने नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने प्रत्यक्षात खरीप खरेदी प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्याचे निश्चित केले आहे. भरडधान्याकरिता ज्वारी (संकरीत) ३ हजार ६९९, मका २ हजार ४००, बाजरी २ हजार ७७५ रुपये प्रति क्विंटल निश्चित केले…
४०० कामगारांची मोफत आरोग्य तपासणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांसाठी तसेच सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन बजरंग तापडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुप्रीम फ्रेंड्स ग्रुप, गाडेगाव, जळगाव आणि सुप्रीम कंपनी व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने २२२ कामगारांनी रक्तदान केले. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिरात कंपनीतील २२२ कामगारांनी स्वेच्छेने रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. तसेच जीएमसीतर्फे ४०० कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचारही करण्यात आला. वयाची ९२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत कंपनी परिसरात ९२ वृक्षांची लागवड करण्यात आली.…
एकल वादन, एकल लोकगीत, समूह लोकगीत प्रकारात उत्तेजनार्थ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न संस्था बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईद्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा – २०२५ लोककला महोत्सवात समूह कातकरी लोकनृत्य प्रकारात विशेष नेपुण्यासह अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्वोत्कृष्ट ठरली. संघाला ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांच्याहस्ते विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच एकल वादन प्रकारात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी साहिल मोरे याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. एकल लोकगीत प्रकारात इयत्ता आठवीतील आराध्य खैरनार या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. तसेच समूह लोकगीत प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या यशाबद्दल स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. समूह…
राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर युवकांचा विश्वास साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सिंधी कॉलनी परिसरातील उत्साही तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेत पक्षात जंगी प्रवेश केला. बदलाची आस, स्पष्ट नेतृत्व आणि शहरासाठी काम करण्याची प्रेरणा अशा तीन गोष्टींनी प्रभावित होऊन तरुणांनी मनसेची वाट निवडल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांच्या थेट, निर्भीड आणि युवकाभिमुख भूमिकेमुळे तरुणांमध्ये मनसेबद्दलचे आकर्षण वाढत असल्याचे स्पष्ट चित्र सिंधी कॉलनीत दिसून आले. प्रवेशप्रसंगी तरुणांनी शहरातील वाढत्या समस्या, वाहतूक अनुशासन, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी यावर ठोसपणे आवाज उठवणाऱ्या पक्षाच्या भूमिकेचे कौतुक केले. सिंधी कॉलनीच्या तरुणांनी “बदल हवा तर धाडस हवं आणि मनसेसोबत उभं राहणं म्हणजे बदलाच्या वाटेला सुरुवात” असा संदेश…