फायद्यांसह आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सीबीएससी पॅटर्न) येथे शनिवारी, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या योगासनांचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी योगाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे फायदे समजावले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार, वृक्षासन, वीरभद्रासन, ताडासन, अर्धमत्स्येन्द्रासन, अर्धहलासन, अनुलोम-विलोम अशी विविध योगासने करून घेतली. यावेळी योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. उपक्रमात विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी विद्यार्थ्यांना योगासनांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित…
Author: Sharad Bhalerao
शिंदखेड्यात ‘सफर अंतराळाची’ आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी : विविध प्रकारची सूर्यग्रहणे, अमावास्या, पौर्णिमा, धुमकेतू अशा निसर्गातील खगोलीय घटना आहेत. त्यात काहीही शुभ-अशुभ नाही. त्याबद्दल अंधश्रद्धा बाळगल्याने आपल्या लहानशा आयुष्यात कधीतरी घडणाऱ्या विलक्षण, सुंदर खगोलीय आविष्काराचा आनंद घेण्यापासून आपण वंचित राहतो. त्याचा मनसोक्त आनंद घेतला पाहिजे, असे प्रतिपादन तन्वी सुषमा परेश यांनी केले. येथील क्रांतीज्योती सखी मंचतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर सभागृहात ‘सफर अंतराळाची’ हा अवकाशाचे दर्शन घडविणारा अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी क्रांतीज्योती सखी मंचच्या अध्यक्षा सुषमा शाह होत्या. येथील मिराबाई गर्ल्स हायस्कूलची तन्वी ही विद्यार्थिनी आहे. ती मुंबई येथील डी.…
धुळ्यातील आरोग्य सेवकांच्या बैठकीत आवाहन साईमत/धुळे/प्रतिनिधी : शहरासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा मिळावा. त्यातून महाराष्ट्रात धुळे जिल्हा योजनेचा सर्वाधिक लाभार्थ्यांचा जिल्हा बनावा, यासाठी आपण सर्वांनी झोकून देत काम करावे. लाभार्थी रुग्णांना योजनेचे बारकावे समजून सांगावेत, शासनाच्या योजनेचा लाभ मिळून गरजूंना दिलासा मिळेल, असे आवाहन आ.अनुप अग्रवाल यांनी केले. राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणाऱ्या शहर परिसरातील विविध रुग्णालयांतील आरोग्य सेवकांची ए. बी. फाउंडेशनच्या पुढाकाराने आ.अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी, १९ जून रोजी बैठक झाली. त्यात आ.अग्रवाल यांनी विविध सूचना देतानाच आरोग्य सेवकांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी ए. बी. फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश…
शहादा न्यायालयाने १० हजार रुपयाचा दंडही ठोठावला साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने ८ वर्षाचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राजू बाबूलाल सरपे असे आरोपीचे नाव आहे. शहादाच्या बुडीगव्हाण येथील राजू सरपे हा पत्नी बानूबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून तो तिला नेहमीच मारहाण करीत होता. गेल्या २९ मे २०२० रोजी बानूबाई, राजू आणि त्यांचा मुलगा गोपाल असे जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. तेव्हा तिथेही राजू याने बानूबाई हिला जबर मारहाण केली. तसेच साडीने गळा आवळला. या घटनेमुळे घाबरलेला मुलगा गोपाल हा धावत गावात आला. त्यानंतर त्याने आईला वडील मारत असल्याचे…
भेटीत वैद्यकीय अधीक्षकांशी केली विविध समस्यांवर चर्चा साईमत/शिरपूर/प्रतिनिधी : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पावरा यांची भाजपाचे धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडीचे सरपंच तथा भाजपा माजी तालुकाध्यक्ष किशोर माळी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे यांनी नुकतीच भेट घेऊन रुग्णालयातील विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील एमडी, एमएस सर्जन, सीटी स्कॅन विभाग आदींची माहिती जाणून घेतली. रुग्णालयात स्वतःची ब्लड बँक असणे, रुग्णांसाठी स्वच्छ व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, रुग्णालयातील कर्मचारी व इतर महिलांसाठी शौचालय बांधणे असणे आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. धुळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन माजी आरोग्यमंत्री डाॅ.…
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणी साईमत/शिरपूर/प्रतिनिधी : ‘आपले सरकार’ सेवा केंद्रातून मिळणाऱ्या विविध प्रमाणपत्रांच्या शुल्कात दुपटीने वाढ करण्यात केली आहे. जात आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आता १२८ रुपये मोजावे लागत आहेत. ही दरवाढ शैक्षणिक वर्ष सुरुवात होत असतानाच लागू झाल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. धुळे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी मुंबईला मंत्रालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच भेट घेऊन प्रमाणपत्रे, दाखल्यांच्या शुल्कात झालेली वाढ कमी करावी, अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, आता शाळा, काॅलेज, महाविद्यालय सुरू झाली आहेत. जात, उत्पन्न, नॉन क्रीमिलेअर,…
आ.अग्रवाल यांच्या सहा महिन्यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश साईमत/धुळे/प्रतिनिधी : शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वसतिगृहांच्या दुरुस्तीसह नवीन इमारतींसाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १७ कोटी ७५ लाख ३८ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. दरम्यान, या निधीमुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींच्या दोन्ही कामांचा मार्ग मोकळा झालाआहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.अग्रवाल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत. शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ७५० विद्यार्थी तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण होऊन दाखल होतात. त्यांच्या निवासाची…
चालक पोलिसांच्या ताब्यात, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघात कैद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरात गुरुवारी, १९ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद चारचाकी चालकाने केलेल्या भीषण ‘हिट अँड रन’ अपघातात ४५ वर्षीय वंदना सुनील गुजराथी यांचा शुक्रवारी उपचारावेळी मृत्यू झाला आहे. अपघातात अन्य दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना शहरातील महाबळ ते वाघनगर रस्त्यावर घडली. दरम्यान, हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहरातील वाघ नगरातील मोंटू शिवपाल सैनी हा कार (क्र. एमएच १९, ईपी १६९४) घेवून भरधाव वेगाने जात होता. महाबळ परिसरातील खासगी क्लासेसजवळ त्याने अनेक वाहनांना धडक दिली. त्यात वाहन…
रामानंद नगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना १८ जून रोजी घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी, १९ जून रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या कालावधीत पीडित मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती मिळू शकली नाही.…
शहर पोलिसात दोन दुकानमालकांविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरात बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे शोषण केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशातच शहरातील फुले मार्केट परिसरातून ६ बालकामगारांची सुटका केली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन दुकानमालकांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बालकामगार प्रथेला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात बालकामगारांकडून कमी वेतनात काम करून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला मिळाली होती. अशा माहितीच्या आधारे सहायक कामगार आयुक्त कार्यालय, शहर पोलीस ठाणे आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे शहरातील आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली. तपासणीदरम्यान, फुले मार्केट परिसरातील ‘सागर सुटकेस…