Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»6 Child Laborers : फुले मार्केट परिसरातून ६ बालकामगारांची केली सुटका
    क्राईम

    6 Child Laborers : फुले मार्केट परिसरातून ६ बालकामगारांची केली सुटका

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 20, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शहर पोलिसात दोन दुकानमालकांविरुध्द गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरात बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे शोषण केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशातच शहरातील फुले मार्केट परिसरातून ६ बालकामगारांची सुटका केली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन दुकानमालकांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बालकामगार प्रथेला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

    शहराच्या वेगवेगळ्या भागात बालकामगारांकडून कमी वेतनात काम करून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला मिळाली होती. अशा माहितीच्या आधारे सहायक कामगार आयुक्त कार्यालय, शहर पोलीस ठाणे आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे शहरातील आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली. तपासणीदरम्यान, फुले मार्केट परिसरातील ‘सागर सुटकेस सेंटर’ नावाच्या दुकानात ४ बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले. तसेच याच परिसरातील ‘ओम ट्रेडिंग’ किराणा दुकानातही २ बालकामगार आढळून आले. पथकाने तात्काळ कारवाई करत अशा दोन्ही दुकानातून ६ बालकामगारांची सुटका केली.

    सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने दिली फिर्याद

    याप्रकरणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने जितेंद्र सुभाष पवार (वय ३८, रा. खोटे नगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर सुटकेस सेंटरचा मालक अनिल नाणूमल मेघवाणी (वय ५३, रा. गणपती नगर) आणि ओम ट्रेडिंगचा मालक राजेंद्र निंबा शिनकर (वय ५१, रा. आदर्श नगर) या दोघांविरुध्द बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. प्रकाश पाटील करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Nashik Crime : थरारक घटना! नाशिकमध्ये भरदिवसा महिलेकडून तरुणाचा खून; आधी दगड, मग कोयत्याने सपासप वार

    April 14, 2026

    प्रेमाचे नाटक, शोषणाचा खेळ! अमरावतीतील धक्कादायक प्रकरण उघड

    April 14, 2026

    सोने-चांदी दरात चढ-उतार; जळगाव सराफ बाजारात सध्या काय भाव?

    April 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.