बंदोबस्तासह उपाययोजनांची नागरिकांनी केली मागणी साईमत/शहादा/प्रतिनिधी : शहरातील बस स्थानकासमोर, भगवा चौक, अहिंसा चौक अशा प्रमुख वर्दळीच्या भागासह विविध वसाहतींमध्ये मोकाट गुरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या कळपाजवळून जाण्याची हिंमत होत नाही. मोकाट जनावरांची बऱ्याचवेळा एकमेकांना शिंगे लावून अचानक लढाई सुरू होते. शहादा शहरात मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात दीनदयाल नगर, प्रेस मारुती ग्राउंड, बस स्थानकासमोर, भगवा चौक, सदाशिव नगर, गरीब नवाज कॉलनी, अहिंसा चौक, मोहिदा रस्त्यासह शहरात विविध भागात अथवा रस्त्यावर कळप करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांलगत मोहिदा रस्त्यावर सायंकाळी खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात. तेथे खवय्यांची गर्दी होते. त्याचवेळी…
Author: Sharad Bhalerao
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, मनपाचे दोन अग्नीशमन बंब झाले होते दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील बेंडाळे चौक ते नेरी नाका दरम्यान असलेल्या चंद्रिका सॉ मिल (वखार व दुकान) येथे गुरुवारी, २६ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घडली होती. आगीची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पथकाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यातील काहींनी माणुसकीचे दर्शन घडवत आग विझविण्यासाठी मदतकार्य केले. दरम्यान, आगीत लाखोंचे साहित्य जळून भस्मसात झाले आहे. आग विझविण्यासाठीअग्निशमन दलाच्या जवानांनी केले प्रयत्न आगीने काही…
एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरापासून जवळील रायपूर कुसुंबा येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी, २६ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. श्रीकांत मोहन धनगर (वय २१, रा. नवीन रायपूर, ता. जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील रायपूर गावातील श्रीकांत धनगर हा आई-वडील आणि भाऊ जय यांच्यासोबत वास्तव्याला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. गुरुवारी, २६ जून रोजी श्रीकांत हा घरी एकटाच…
साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील नवीन बसस्थानक आवारातून खिसे कापून चोरी करणाऱ्या टोळीतील तीन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी, २५ जून रोजी दुपारी ४ वाजता अटक केली आहे. तिघेही आरोपी अमरावती जिल्ह्यातील आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, पाच मोबाईल आणि इंडिका कार असा साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने गुरूवारी, २६ जून रोजी दिली. बसस्थानकात गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे खिसे कापून पैसे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीचे…
नाशिक मनपा, रोटरी क्लब ऑफ गोदावरीचा अभिनव उपक्रम साईमत/नाशिक/प्रतिनिधी : शहरात पर्यावरण संवर्धनाची दिशा देणाऱ्या एका अभिनव उपक्रमाचा प्रारंभ आकाशवाणी टॉवरजवळील भाजी बाजार येथे करण्यात आला. नाशिक महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवीच्या वेंडिंग मशीनचे उद्घाटन मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या हस्ते झाले. हा उपक्रम सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. भाजी बाजार व विविध बाजारपेठांमध्ये पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे. प्रत्येक नाशिककराने पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारल्यास गोदावरी नदीचे व शहराचे प्रदूषण कमी होण्यास…
संघर्षयात्रींमध्ये आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचा समावेश साईमत/धुळे/प्रतिनिधी : देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस आज ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या धुळ्यातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्रासह गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी, २५ जून रोजी सकाळी झाला. जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्यासह अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, नायब तहसीलदार श्रीकांत देसले, यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटूंबिय आणि वारस उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात…
डिसेंबर २४, मार्च २५ रोजीचे निघालेले सरपंच पदाचे आरक्षण रद्द साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी : तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ३० जून रोजी अकरा वाजता नव्याने आरक्षण सोडत शिंदखेडा तहसील कार्यालयात होणार असल्याचे तहसीलदार अनिल गवांदे यांनी सांगितले. ग्रामविकास विभाग यांच्याकडे ५ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, यापूर्वी शिंदखेडा तालुक्यात मार्च २०२५ मध्ये १०० ग्रामपंचायतींच्या २०२५-२०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता आरक्षण सोडत घेण्यात आली होती. पेसाव्यतिरिक्त असलेल्या १२३ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीकरिता ७ ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीकरिता २६ ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता ३३ ग्रामपंचायती तर उर्वरित ५७ पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित केली होती. ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई, यांच्याकडील १३ जून २०२५ रोजीच्या राजपत्रातील…
चिखलामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी : येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. भाजीपाला विक्रेत्यांना बाजार समितीच्या आवारातच चिखलात प्लास्टिकची पाल टाकून भाजीपाल्याच्या लिलाव करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी आणताना चिखलामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात बस स्थानकाच्या बाजूला बाजार समितीचे आवार आहे. आवारात व्यापाऱ्यांचे गोडाऊन आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालासह भाजीपाल्याचा लिलाव अनेक वर्षापासून होत आहे. पावसाळ्याची सुरुवात होताच बाजार समितीच्या परिसरात कोणतीही जलनिचरा व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचून अक्षरशः चिखल होतो. चिखलातच शेतकऱ्यांना पाल टाकून आपल्या मालाचा लिलाव करावा लागतो.…
आणीबाणीत कारावास झालेल्या बंदिवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी : आणीबाणीच्या कालखंडात जिल्ह्यातील ज्या गौरवमुर्तींना कारावास भोगावा लागला. त्यांच्या संघर्ष आणि लढ्यामुळे लोकशाही बळकट झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले. त्या बुधवारी, २५ जून रोजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागलेल्या बंदिवानांच्या गौरव समारंभ आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी महेश चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, महसूल तहसिलदार जगदीश भरकट, निवासी नायब तहसीलदार (महसूल) रिनेश गावित, उदेसिंग पाडवी, लक्ष्मण कदम, भगवानदास अग्रवाल, नजुबाई गावित, प्रसन्नकुमार बारगळ, वाहरु सोनवणे, इंद्रपालसिंह राणा, हरचंद कोळी आदी उपस्थित होते. यावेळी गौरवमूर्ती उदेसिंग पाडवी, लक्ष्मण…
१० वर्षातील विक्रमी पावसाची नोंद, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू साईमत/नाशिक/प्रतिनिधी : नाशिक शहरासह जिल्ह्यात यंदाच्या जून महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर प्रथमच शहरात जूनमध्ये ३१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सलग सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहर आणि पाणलोट क्षेत्रातील धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला आहे. परिणामी, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सध्या ६५ टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे सुमारे ६ हजार क्यूसेस वेगाने पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरीच्या पात्रात पाणीप्रवाह वाढला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले आहे तर दारणा, कडवा आणि नांदूर…