विद्यार्थ्यांना व्यसनांपासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देणे गरजेचे साईमत/नवापूर/प्रतिनिधी : येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ व महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत अमली पदार्थ व अवैध तस्करी गैरप्रकार जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश भाविका परमार होत्या. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश धनंजय देवरे, नवापूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष रामू वळवी, सचिव प्रदीपकुमार गावित, मुख्याध्यापिका कमल कोकणी, उपमुख्याध्यापक ए.एन.सोनवणे, पर्यवेक्षक हरीष पाटील, पर्यवेक्षक जी.डी.सूर्यवंशी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाविका परमार, धनंजय देवरे, रामू वळवी यांनी मनोगत व्यक्त केले. समाजात व्यसनांमुळे घडत असलेल्या वास्तविक घटनांवर प्रकाश टाकून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून होणाऱ्या दुष्परिणामांची…
Author: Sharad Bhalerao
राज्यातील समस्त शेतकऱ्यांची आ.लोणीकर यांनी माफी मागावी साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपचे आ. बबनराव लोणीकर यांचा शिवसेना उबाठा गटातर्फे शिवाजी चौकात ‘जोडो मारो’ आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आ.लोणीकर यांनी राज्यातील समस्त शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या परिवाराला आम्ही पोसतो, असे वादग्रस्त विधान भाजपचे आ.बबनराव लोणीकर यांनी केले होते. शिवसेना उबाठा गटाच्यावतीने लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे म्हणाले की, शासन विविध योजनांच्या माध्यमातून देत असलेला पैसा हा या राज्यातील शेतकऱ्यांचा व नागरिकांचाच आहे. सरकार…
शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोसमधील आश्रमशाळेत प्रतिपादन साईमत/धुळे/प्रतिनिधी : प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उत्कर्ष ग्राम अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा मिळणार आहेत. आदिवासी समाजात धरती आबा योजनेमुळे परिवर्तन होणार आहे. आदिवासी समाजाचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. धरती आबा जन भागीदारी अभियानातंर्गत शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील शासकीय आश्रमशाळेत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. शिबिरास कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा सभापती नारायण भाऊसाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार अनिल गवांदे, अपर तहसीलदार संभाजी पाटील, महिला बाल विकास अधिकारी अजय…
खबरदारीच्या उपायासाठी प्रशासनाने उघडले दरवाजे साईमत/जळगाव/प्रतिनिधी : यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे ४६ पैकी ८ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. विदर्भात तसेच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पूर्णा नदीतून आलेला जलसाठा हतनुरमध्ये पोहोचल्याने, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या तापी नदीत १० हजार क्युसेक्स प्रति सेकंद या गतीने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती हतनूर प्रशासनाने दिली. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस…
जामनेरचे ‘अमृतयात्री’ डी.डी.पाटील यांनी केला गौरव साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ कौतिकराव खोडके हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. याबद्दल ‘अमृतयात्री’ डी.डी.पाटील यांनी त्यांच्या सेवा कार्याची दखल घेत त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करुन गौरव केला. डॉ.खोडके हे जामनेर तालुक्यातील भराडी येथील रहिवासी आहेत. ते पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून ७ जुलै १९८८ पासून कार्यरत झाले होते. त्यांनी कापूसवाडी, लोहारा, गोंडखेल, जामठी, वाकोद अशा विविध ठिकाणी सेवा दिली. शासकीय सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची दखल घेत डी.डी.पाटील त्यांचा सन्मान करतात. डॉ.खोडके हे प्रामाणिकपणे सेवा देणारे अधिकारी म्हणून परिचित होते. त्याबद्दल त्यांचा साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी.पाटील यांनी सत्कार…
फास्ट ट्रॅक न्यायालयात प्रकरण चालवून तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस महाजन या मुलाचा तेरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून केला होता. हा खून नसून नरबळीचा संशय व्यक्त करत शुक्रवारी, २७ जून रोजी रिंगणगावसह परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रोष व्यक्त केला. ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, नरबळीचे कलम लावावे, तपास सीआयडीकडे सोपवावा अशा मागण्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत. मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी खा. स्मिता वाघ उपस्थित होत्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर केवळ मर्यादित लोकांनाच…
साईमत/नाशिक/प्रतिनिधी : ऑलिम्पिक क्रीडा सप्ताह अंतर्गत २४ ते ३० जून दरम्यान विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्याप्रमाणे तलवारबाजी, बास्केटबॉल आणि गोल्फ स्पर्धा पार पडल्या. २६ जून रोजी सर्व खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, आयोजक यांच्या उपस्थितीत नाशकच्या पेठ येथील चामर लेणी येथे बाजी उधळण आणि बीजारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विविध शाळांच्या २१७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. त्यामध्ये सरस्वती गुलाबराव पाटील शाळा, कोहिनुर इंटरनॅशनल स्कुल, उन्नती विद्यालय आदी शाळांचा समावेश होता. यावेळी आयोजक अशोक दुधारे, अशोक कदम, आनंद खरे, दीपक निकम, सौ. विजया दुधारे, आनंद चकोर, भूषण भटाटे, उत्कर्ष परदेशी, शाळाचे शिक्षक सुनील बिरारी, आरती पुंड,…
मनपाच्या नाकर्तेपणाचा बसतोय फटका साईमत/नाशिक/प्रतिनिधी : शहरातील खड्डेमय रस्ते वाहतूक कोंडी आणि अपघाताचे कारण ठरत असताना मनपाकडून दुरुस्तीकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. पंचवटीतील रासबिहारी चौकात महामार्ग आणि सेवा रस्त्याला जोडणाऱ्या भागात भलामोठा खड्डा पडल्याने अशीच स्थिती निर्माण झाली. हे लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी खडीने स्वत: हा खड्डा भरून घेत वाहनधारकांसाठी रस्ता सुरक्षित केला. मनपाच्या कारभाराने वाहतूक पोलिसांवर रस्त्यांवरील खड्डे भरण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून उमटली. यासंदर्भात मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. खड्डे दुरुस्तीची सद्यस्थितीही स्पष्ट झाली नाही. सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसात शहरासह औद्योगिक वसाहतीतील अनेक रस्त्यांची…
संविधानाच्या उद्देशिकेचे केले सामूहिक वाचन साईमत/धुळे/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून समाजकल्याण विभागामार्फत काढण्यात आलेल्या समतेचा संदेश देणाऱ्या समता दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर तसेच मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून समता दिंडीची सुरुवात करण्यात आली. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा,…
मनोरुग्णाला केले उपजिल्हा रुग्णालयात दाखल साईमत/नवापूर/प्रतिनिधी : शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा १०८ रुग्णवाहिकेचे पायलट लाजरस गावित यांनी पोलिसांसह मित्राच्या मदतीने एका मनोरुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन त्याचे प्राण वाचविले आहेत. मनोरुग्ण व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्यांना सहानुभूती आणि मदतीची गरज असते. या घटनेमुळे शहरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. नवापूर शहरातील गुजरातीसमोर एक अनोळखी मनोरुग्ण आपले जीवन कसे तरी जगत होता. अशातच सायंकाळच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते लाजरस गावित यांना फोन आला. एक अनोळखी व्यक्ती आहे, त्याला रुग्णवाहिका पाहिजे आहे. त्यानंतर ते त्याठिकाणी पोहचले. त्याठिकाणी मनोरुग्णाला त्यांनी बघितले. परंतु त्याची अवस्था खुपच दयनीय होती. त्याला चालताही…