जळगावातील आयोजित कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी केले प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतीय साहित्याने आपल्या सामाजिक वास्तवाला दुर्लक्षित न करता साहित्याच्या माध्यमातून जगापुढे आणण्याचा जो प्रयत्न केला त्यात दलित, आंबेडकरी, स्त्री साहित्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कवयित्री ज्योती वाघ-बाविस्कर यांचा ‘ओसंडले शब्दकण’ हा कवितासंग्रह तोच वसा आणि वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. साहित्य हा समाजाचा आरसा आहे, असे प्रतिपादन डॉ.मिलिंद बागुल यांनी केले. सत्यशोधकी साहित्य परिषदेने महाबळ रस्त्यालगतच्या अभियंता भवनात आयोजित कवयित्री ज्योती वाघ-बाविस्कर यांच्या ‘ओसंडले शब्दकण’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कवयित्री माया धुप्पड, गझलकार ज्ञानेश पाटील यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ‘ओसंडले शब्दकण’…
Author: Sharad Bhalerao
जनक्रांती मोर्चातर्फे पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : धरणगाव येथील पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेना शिंदे गटाचे मागासवर्गीय विभागाचे जिल्हा प्रमुख मुकुंद शामराव नन्नवरे (रा.पाळधी, ता.धरणगाव) यांना ५ जून ते २३ जूनपर्यंत रात्री-अपरात्री गुंड प्रवृत्तीच्या अज्ञाताने भ्रमणध्वनीद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्याबाबत पाळधी पोलीस दुरक्षेत्रात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा होऊनही त्याच्यावर अद्यापही कारवाई न झाल्याने महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्यावतीने जळगावचे पोलीस अधीक्षक यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. धमकीमुळे मुकुंद नन्नवरे यांचे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. तसेच कुटुंबात भीतीसह दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीची तातडीने चौकशी करून त्याच्यावर कारवाई…
‘पुष्पक’वर होतोय सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील श्रद्धा कॉलनीतील रहिवाशी पुष्पक नरेंद्र अत्तरदे याने आंध्रप्रदेशातील श्री सिटीतील क्रिया विद्यापीठातून एमबीएची (मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) पदवी ‘कॉन्टीटेटीव्ह फायनान्स’ विषयातून मिळवून विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे. त्याने शैक्षणिक वर्ष २०२३ -२०२५ या कालावधीत एमबीएमची पदवी संपादन केली आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत त्याने यश मिळविले आहे. त्याला विद्यापीठातील प्रा.ईश्वरण, प्रा.तपणकार, विभागाच्या डीन माधुरी सरीपल्ली, प्रा.विनोदकुमार यांचे मार्गदर्शन लाभले. ‘रिस्क मॅनेजमेंट’ क्षेत्रात यश मिळविण्याचा मानस त्याच्या यशात त्याच्या आई-वडिलांसह मित्र परिवाराचा वाटा आहे. भविष्यात ‘रिस्क मॅनेजमेंट’ क्षेत्रात त्याने यश मिळविण्याचा मानस व्यक्त केला आहे. तो नरेंद्र एकनाथ अत्तरदे यांचा चिरंजीव…
संविधान संमेलनाच्या पूर्वतयारी बैठकीत व्यक्त केले मत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतीय जनमानसात लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण झाली आहे. धर्मांधतेला पोषक वातावरण राजसत्तेकडून निर्माण होत असताना भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष तथा संविधान संमेलनाचे निमंत्रक मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या संविधान संमेलनाच्या पूर्वतयारीनिमित्त पद्मालय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुकुंद नन्नवरे होते. बैठकीत धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांना फोनवरून आलेल्या धमकीचा जाहीर निषेध करण्यात आला. बैठकीत संविधान संमेलनाच्या अनुषंगाने डॉ. मिलिंद बागुल यांनी भूमिका मांडली. प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनात वैचारिक परिसंवाद,चर्चासत्र आयोजित करण्यात…
उपाययोजना राबविण्याचे संबंधित विभागांना दिले निर्देश साईमत/जळगाव/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोल, जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी रविवारी, २९ जून रोजी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने पूल परिसरात पूर्व तयारीचा आढावा घेतला. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढून निर्माण होणाऱ्या संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याचे संबंधित विभागांना निर्देश दिले. पाहणी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सिंचन विभाग यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी भुसावळचे प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ, सिंचन विभागाच्या…
सरकार विरुध्द निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : एकीकडे मराठीच्या मुद्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असतांना जळगावात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे आंदोलन केले. जळगावमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना उबाठा आणि मनसे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. येथे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित आंदोलन केले. याप्रसंगी सरकार विरुध्द निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. आंदोलनात पहिलीपासून हिंदीची सक्ती करणाऱ्या राज्य शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. दरम्यान, राज्यात शिवसेना उबाठा आणि मनसे अधिकृतपणे एकत्र येण्यापूर्वीच जळगावात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र…
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बजावली कामगिरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव शहरासह रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच जळगाव आरपीएफने धडक कारवाई करत दोन सराईत मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कामगिरी बजावत २६ जून रोजी त्यांच्या ताब्यातून ५ महागडे मोबाईल फोन हस्तगत केल्याची माहिती शनिवारी, २८ जून रोजी आरपीएफ विभागाने दिली. सविस्तर असे की, भिकन नवल पाटील ह्या प्रवाशाचा १ लाख ३० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा मोबाईल बदनेरा-नाशिक मेमो ट्रेनमध्ये चढत असताना जळगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून १७ जून रोजी चोरीला गेला होता. याप्रकरणी जीआरपी भुसावळ येथे गुन्हा दाखल केला होता. आरपीएफ इन्स्पेक्टर…
रिंगणगाव खून प्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कलम वाढविले साईमत/जळगाव/प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याचा गेल्या १६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली. ही हत्या नसून नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी तेजसच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, या मागणीसाठी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चानंतर खुनाच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता ग्रामस्थांनी नरबळीची शक्यता वर्तवल्याने जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत कलम वाढविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लावला जाणार आहे. एरंडोल तालुक्यातील रिंगणगावचे…
प्रलंबित अन् विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी: प्रलंबित आणि विविध मागण्यांकडे सरकार तसेच सेवा पुरवठादार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी येत्या मंगळवारी, १ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी, २८ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णवाहिका चालकांनी माहिती दिली. जळगाव येथील १०८ रुग्णवाहिका चालक युनियनने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून चालक अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य सेवा पुरवित आहेत. मात्र, त्यांना मिळणारे अल्प वेतन, रुग्णवाहिकांची दयनीय अवस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात चालकांनी यापूर्वीही अनेकवेळा निवेदने दिली आहे. आंदोलनेही केली आहेत. परंतु, तरीही त्यांच्या मागण्यांची दखल…
नागरिकांनी महसूल विभागाच्या उपक्रमाचे केले कौतुक साईमत/धुळे/प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील करवंद परिमंडळ अंतर्गत मांडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नुकतेच पार पडले. शिबिरात महसूल विभागाच्यावतीने नागरिकांना विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास आ.काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार महेश साळुंखे, पुरवठा निरीक्षक श्री. ठाकरे, पंचायत समितीचे माजी सदस्य यतीश सोनवणे, माजी सरपंच सुनील सोनवणे यांच्यासह करवंद, मांडळ परिमंडळातील तलाठी, कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे मंजुरी आदेश, मोफत वाळू वाहतूक परवाने व जिवंत सातबारा उतारे अशा…